*आमदार प्रा राम शिंदे हे शुक्रवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज*
*कर्जत जामखेड :* कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रा राम शिंदे हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता, अत्यंत साधेपणाने हा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार प्रा राम शिंदे यांना भारतीय जनता पार्टीने सलग चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे.यंदा होणाऱ्या निवडणूकीसाठी आमदार प्रा राम शिंदे हे उद्या २६ रोजी दुपारी १२ नंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबत आमदार प्रा राम शिंदे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीत माहिती दिली आहे.
सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व नेते यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर उमेदवार म्हणून उद्या शुक्रवार दि.२५, ऑक्टोबर २०२४ रोजी १२ वाजेनंतर २२७- कर्जत – जामखेड ” जिल्हा अहिल्यानगर या मतदारसंघातून अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिशय साध्या पद्धतीने कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता, सामान्य व्यक्तीच्या व पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते व उपस्थित उमेदवारी अर्ज भरून, आपण ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते या सर्वांनी नोंद घ्यावी व उपस्थित रहावे ही विनंती, असे आमदार शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.