*आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचे जामखेड शहरात अतिशय उत्साहात पुष्पवृष्टी करत स्वागत*

जामखेड प्रतिनिधी,

पुणे ते नागपूर अशी युवा संघर्ष पदयात्रा आमदार रोहित पवार यांनी सुरू केली असून एकूण 800 किलोमीटरहून अधिक ही पदयात्रा जाणार असून यामध्ये युवांशी संबंधित विविध समस्या सोडवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. बेरोजगारी कंत्राट भरती अशा विविध एकूण वीसहून अधिक मुद्दे घेऊन ही युवा संघर्ष पदयात्रा हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे धडकणार असून या संघर्ष यात्रेदरम्यान आमदार रोहित पवार हे महाराष्ट्रातील तमाम युवांशी व नागरिकांशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.

एकूण 25 जिल्हे 28 तालुके यामधून ही यात्रा जाणार असून 12 डिसेंबर म्हणजेच शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ही यात्रा नागपूर येथे पोहोचणार आहे. युवांसाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेत ही संघर्ष यात्रा सुरू केली असून त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नुकतीच जामखेड शहरात या पदयात्रेचे राष्ट्रवादी पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी जेसीबीतून पुष्पवृष्टी करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले असून जामखेड नंतर बीड जिल्हा, परभणी जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, असं करत पुढे वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा अशा पद्धतीने ही यात्रा नागपूर येथे पोचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *