आमदार रोहित दादा पवार यांनी खर्डा येथील कै. बाळू निकम यांच्या मुलीच्या शिक्षणाची फी भरून दिला मदतीचा हात..

आ.पवार यांनी श्रीमती हेमलता निकम यांच्या चहा व्यवसायाला दिली भेट…
जामखेड प्रतिनिधी,

खर्डा येथील चहाचा व्यवसाय करणाऱ्या श्रीमती हेमलता निकम या विधवा महिलेच्या चहा टपरीला आमदार रोहित दादा पवार यांनी भेट देऊन पतीच्या अपघाती मृत्यूची सहानभूतीपूर्वक चौकशी करून इंजिनिअरिंगला शिक्षण घेत असलेल्या मुलीच्या शैक्षणिक वर्षाची 46 हजार रुपये फी देऊन मदतीचा हात दिल्याने उपस्थितांमध्ये भावूक वातावरण निर्माण झाले.

याबाबत माहिती अशी की, आमदार रोहित दादा पवार हे खर्डा येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला आले असता त्यांनी खर्डा पोलीस स्टेशनसमोर श्रीमती हेमलता निकम या विधवा महिलेने सुरू केलेल्या चहाच्या व्यवसायाला भेट दिली असता, श्रीमती निकम यांनी बोलताना सांगितले की, माझे पती बाळासाहेब निकम हे प्रसिध्द अशा चहाचा व्यवसाय करीत होते त्यांना मोटरसायकलची धडक दिल्याने त्यांना जखमी अवस्थेत नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु मोठा आर्थिक खर्च होऊनही त्यांचा कमी वयात दुर्दैवी मृत्यू झाला. पुढे माझ्या जीवनात मोठा अंधकार पसरला होता

एक मुलगी इंजिनिअरिंगला शिक्षण घेत होती, तर मुलगा शालेय शिक्षण घेत असताना कुटुंब चालवणे व मुलांचे शिक्षण कसे पूर्ण होणार अशा दुहेरी मनस्थितीत असताना मी जिद्दीने पुन्हा स्व. पती बाळू निकम यांनी चालवलेला चहाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये कसेतरी प्रपंच भागवून मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी कष्ट घेत आहे. यासाठी त्यांनी मुलगी कु. ईश्वरी निकम ही उस्मानाबाद येथील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला शिक्षण घेत आहे तिच्या यावर्षाची शैक्षणिक फी भरण्यासाठी पैसे नसल्याचे त्यांनी आमदार रोहित पवार यांना सांगितले या महिलेची ही व्यथा ऐकून आमदार पवार भावनिक झाले त्यांनी लागलीच संपूर्ण वर्षाची 46 हजार रुपये शैक्षणिक फी स्वतः मदत म्हणून देण्याचे त्यांनी कबूल केले तसेच कु.ईशा निकम हिचे शैक्षणिक शिक्षण व इंजिनियर पदवी पूर्ण झाल्यावर तिला नोकरी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले त्यामुळे उपस्थित कार्यकर्तेही भावुक झाले.


आमदार रोहित दादा पवार यांनी यापूर्वी ही पोतेवाडीच्या सौ. सुनिता बापू पोते या महिलेच्या फलटण येथे डॉक्टर हेमंत मगर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ऑपरेशन साठी एक लाख रुपयांची मदत करून याही गरीब कुटुंबाला मदतीचा हात दिला होता.
अशा अनेक संकट समयी आमदार रोहित पवार हे वेळोवेळी गरीब गरजू कुटुंबाच्या मदतीला धावून जातात तसेच त्यांनी आतापर्यंत हजारो लोकांच्या विविध आजारांचे ऑपरेशनही त्यांच्या यंत्रणेच्या मदतीने केली आहेत. त्यांनी खर्डा येथील निकम कुटुंबाला शैक्षणिक फी भरून मदतीचा हात दिल्याने त्यांच्या दातृत्वाची चर्चा मात्र सगळीकडे होताना दिसून येत होती.
ही भेट घडवून आणण्यासाठी पत्रकार दत्तराज पवार यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर,ग्रामपंचायत सदस्य दादा जमकावळे, प्रकाश गोलेकर,श्रीकांत लोखंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुनील लोंढे कल्याण सुरवसे, राजुभाई सय्यद,राजू लोंढे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *