जामखेड शहराला संजीवनी असलेला भुतवडा तलाव ओव्होरफ्लो जामखेड शहराची पाण्याची चिंता मिटली*

*जामखेड शहराला संजीवनी असलेला भुतवडा तलाव  ओव्होरफ्लो जामखेड शहराची पाण्याची चिंता मिटली*

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड शहरासाठी संजीवनी असलेला  भुतवडा तलाव आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरला आहे. संपूर्ण जामखेड शहराला भुतवडा तलावातून विना लाईट विना मोटार पाणीपुरवठा होत आहे. तलाव भरल्यामुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी मिटला आहे. तलाव पूर्ण शमतेने भरल्यामुळे जामखेड शहरात आनंदाचे वातावरण आहे. व नागरिक तलाव कडे पाहण्यासाठी धाव घेताना दिसत आहेत

आतापर्यंत पावसाळा जवळपास कोरडाच गेल्यामुळे शेतकरी चिंतेत होते . शेतकरी चिंतेत असल्यास संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडते. तालुक्यात अनेक ठिकाणी अजूनही पाण्याची टंचाई आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरु आहेत तीन महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. श्रावण महिना ही जवळजवळ कोरडाच गेला.

जामखेड तालुक्यातील शेती ही संपूर्णतः पावसावर अवलंबून आहे. त्यातच यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळजवळ वाया गेल्यासारखा आहे.

गणपतीचे आगमन होताच जामखेड शहर व तालुक्यात गेल्या चार पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीशी दूर होणार आहे.

चार पाच दिवस तालुक्यात ठीक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. शनिवारी मात्र दिवसभर या परिसरात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

शुक्रवार शनिवारी पडलेल्या पावसामुळे सौताडा धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेले बंधारे भरून वाहू लागले व पावसाचा जोरही चांगला असल्यामुळे विंचरणा नदीतून झालेल्या जोरदार प्रवाहामुळे भुतवडा तलाव रात्रीतून पूर्ण क्षमतेने भरला.

  आज सकाळी 7 वाजल्यापासून  तलावाच्या सांडव्यातून पाणी विसर्ग होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या विंचरणा नदीलाही आज पाण्याच्या प्रवाहात वाढ झालेली दिसत आहे.

  जामखेड शहरातील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आज भरलेल्या भुतवडा तलावामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ाची चिंता मिटली असून जामखेड वासीयांननी मोठा आनंद साजरा केला आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page