जामखेड प्रतिनिधी,
केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले असून या नऊ वर्षात देश सेवा, सुशासन, तसेच गरीब कल्याणकारी योजना ह्या केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने राबविल्या असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
मोदी @9 (मोदी एट नाइन) या भाजपाच्या केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जनसंपर्क अभियाना संदर्भात माहिती देण्यासाठी खा.विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेस भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे व अध्यक्ष महेन्द्र गंधे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पत्रकारांशी सविस्तर बोलतांना ते म्हणाले की केंद्रात 2014 सालि भाजपचे सरकार आले तेव्हाची परिस्थिती आणि आज नऊ वर्षा नंतरची परिस्थिती पाहता अमुलाग्र बदल झालेला असल्याचे आपणांस लक्षात येईल. यात प्रामुख्याने गरीब कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा उल्लेख करता येईल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशात करोडो गरिबांसाठी घर बांधून देण्यात आली आहेत, पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ योजनेद्वारे पिण्याचे पाणी पोहचविण्यात आले आहे. शेतकरी सन्मान योजना, पीक विमा, या सारख्या अनेक लोककल्याणकारी योजना ह्या राबविल्या जात आहेत. अशा योजनेतून गरिबांचे कल्याण या बरोबरच महिला सक्षमीकरण धोरण हे देखील अत्यंत प्रभावी पणानी या नऊ वर्षात राबविले आहे. अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तरी या जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी हा रस्ते, पायाभूत सुविधा, विमानतळ या सारख्या विविध बाबी करिता मंजूर होहून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. अलीकडे विरोधकांना काय काम उरले नसल्यानं जातीय द्वेष , दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम हे सध्या होत आहे.
नवीन उद्योजकांसाठी स्टार्टअप सारख्या योजना देखील
गेल्या आहेत. या करिता केलेल्या कामाचा आढावा उपस्थित पत्रकारांना सविस्तर देण्यात आला.
तसेच भाजप पदाधिकारी यांच्यासमवेत सदर अनुषंगाने बैठक घेवून त्यांना 1 महिन्यात होणाऱ्या उपक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले.
या बैठकीस भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी यांची उपस्थिती होती.