जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतल मोहरी शिवारातील हाळणावर वस्ती येथे आज दि. ३ रोजी सकाळीच एक निर्घृण खूनाची घटना घडली असून मोहरी व खर्डा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत अशोक धोंडीबा हाळनावर या ५३ वर्षीय व्यक्तीचा चार जणांकडून खुन करण्यात आला असून यातील चारही आरोपींना खर्डा पोलीसांनी जेरबंद केले आहे.


या बाबत मयत अशोक धोंडीबा हाळणावर यांचा मुलगा आनंद अशोक हाळणावर वय ३० याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे वडिल अशोक हे आमचे घरापासून तेलंगशी फाटा येथे आमच्या शेतामध्ये दररोज जणावरे चारण्यासाठी घेवुन जात होतो. त्यानुसार आज दि. ३ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजताचे सुमारास आम्ही आमचे वस्तीवर उन जानावरे घेवून तेलंगशी फाटा येथे जाण्याकरीता निघालो असता माझा चुलत भाऊ युवराज बाबासाहेब हाळणावर याने माझ्या वडीलांना तुम्ही शेतातून गुरे घेवून जावू नका. असे म्हणुन शिवीगाळ करून तुम्ही गुरे घेवून गेला तर जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली.

त्यावेळी माझे वडीलांनी त्यास तु मला शिवीगाळ करू नको, आपले जमीनीचे वाटप झालेले नाही. असे म्हणून वडील अशोक हे आमचे सामाईक पडीक शेतामधून जणावरे घेवून जात असताना. युवराज हाळणावर त्याचे घरी जावून हातामध्ये कुऱ्हाड घेवून माझे वडिलांचे दिशेने जात असताना मला दिसला. त्याचे पाठोपाठ त्याचा भाऊ दत्तात्रय बाबासाहेब हाळणावर हा सुध्दा गेला, त्यामुळे मी त्यांचे पाठोपाठ माझे वडीलांकडे गेलो. त्यानंतर पुन्हा युवराज बाबासाहेब हाळणावर याने माझे वडीलांना शिवीगाळ चालू केली त्याचवेळी नवनाथ हाळणावर व आप्पा हाळनावर हे माझे वडीलांचे जवळ आले, त्यांनी सर्वांनी वडीलांना शिवीगाळ करून त्यांचेपैकी तिघांनी माझे वडीलांना हाताने मारहाण चालू केली व युबराज बाबासाहेब हाळणावर याने त्याचे हातातील कुन्हाडीने माझे वडीलांच्या मानेवर, गळ्यावर दोन तीन वार केले त्यामुळे माझे वडील जखमी होऊन खाली पडले.

युवराज याने पुन्हा त्याचे हातातील कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार केला, त्यावेळी मी तसेच माझे चुलते बाळासाहेब धोंडीबा हाळणावर, चुलती अनिता बाळासाहेब हाळणावर व ज्योती मनोज हळणावर असे आम्ही वडीलांजवळ भांडणे सोडविणे करीता गेलो असता, वरील चौघे जण तेथून पळून निघून गेले. त्यानंतर जखमी वडीलांना मी तसेच माझे चुलते बाळासाहेब हाळणावर असे आम्ही वडीलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे घेवून गेलो असता तेथील डॉक्टरांना वडीलांना तपासून ते मयत झाल्याचे आम्हाला सांगीतले.
तरी दत्तात्रय बाबासाहेब हाळणावर, नवनाथ सिताराम हाळणावर व आप्पा नवनाथ हाळणावर यांनी माझे वडीलांना हाताने मारहाण केली व युवराज बाबासाहेब हाळणावर याने त्याचे हातातील कुऱ्हाडी माझे वडीलांचे मानेवर, गळ्यावर मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले आहे. म्हणुन माझी युवराज, बाबासाहेब हाळणावर, दत्तात्रय बाबासाहेब हाळणावर, नवनाथ सिताराम हाळणावर व आप्पा नवनाथ हाळणावर सर्व रा.हाळणावर वस्ती, मोहरी यांचेविरूध्द फिर्याद आहे.
यानुसार मयताचा मुलगा आनंद अशोक हाळणावर याने दिलेल्या फिर्यादीवरून गु. र. रजि. नं. 134/2023 भा.द.वि. 302,323,504,506,34 प्रमाणे खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *