*राज्यपुरस्कृत आवास योजनेत जामखेड नाशिक विभागात प्रथम तर आरणगाव ग्रामपंचायतही विभागात प्रथम*

अमृत महा आवास अभियान 3.0 स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये जामखेड पंचायत समितीने राज्यपुरस्कृत आवास योजनेत नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जामखेड प्रतिनिधी,

मागील दोन वर्षांपासून जामखेड पंचायत समितीने घरकुल योजनेमध्ये आघाडी घेतल्याचे पाहायला मिळते. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी विविध उपक्रम राबवून जामखेड तालुक्यातील घरे वेळेवर पूर्ण होतील याकडे सातत्याने लक्ष दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, रोजगार सेवक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता या सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनत घेऊन 97 टक्के घरे पूर्ण केली. याचे फलित म्हणून अमृत महाआवास अभियान 3.0 स्पर्धेमध्ये जामखेड पंचायत समितीने राज्य पुरस्कृत आवाज योजनेत नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आरणगाव ग्रामपंचायतने राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नाशिक विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

*यशाचे श्रेय निरनिराळ्या आघाड्यांना..!*
___________________________

*गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी यशाचे श्रेय देताना केवळ स्वतः पूरते सिमित न ठेवता लोकप्रतिनिधी,वरिष्ठ अधिकारी तालुक्यातील पत्रकार अशा विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या मंडळीं बद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले, त्यांना यशाचे श्रेय दिले…!*

*गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले, “या यशात जामखेड तालुक्यातील पत्रकारांचाही मोठा वाटा आहे. कधी झाली नव्हती एवढी जाणीव जागृती पत्रकार बंधूनी केली. काही गावात वर्तमानपत्रातील बातम्यांचे फ्लेक्स लागले. हे महाराष्ट्रात फक्त जामखेडमध्ये घडले असेल.*

*तहसीलदार योगेश चंद्रे यानी गौण खनिजाबाबत वेळोवेळी मदत केल्याने काम अधिक सोपे झाल्याचे त्यांनी सांगितले.*

*जामखेड तालुक्यातील सन्माननीय जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच/सदस्य, सक्रिय कार्यकर्ते/सामाजिक कार्यकर्ते यांनीही घरकुल भेटी देताना अधिकारी/कर्मचाऱ्यांना मोठी मदत केली.*

*जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त. मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक सुनीलकुमार पठारे, तसेच DRDA चे साळवे साहेब आणि टीम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. CEO साहेबांनी प्रत्येक तालुक्याला जाऊन 2-3 बैठका घेतल्या, DRDA ने तांत्रिक अडचणी।सोडविण्यासाठी दिवस रात्र प्रतिसाद दिला, यामुळे काम करण्यास चालना मिळाली.*

*खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, आमदार रोहित पवार आणि . आमदार राम शिंदे यांनीही प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले..*

*पंचायत समितीच्या व आरणगाव ग्रामपंचायतच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सहायक गविअ कैलास खैरे, विस्तार अधिकारी बी के माने, शंकरराव गायकवाड, सिद्धनाथ भजनावळे, सुनील मिसाळ सरपंच अंकुश शिंदे, ग्रामसेवक विनोद खुरंगुळे, सुजित पवार, रुपेश वाघमारे, संकेत पंचमुख, प्रीतम दीक्षित तसेच सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *