जामखेड प्रतिनिधी
अहमदनगर विभागातील गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ नुकताच सीएसआरडी कॉलेज चांदणी चौक अहमदनगर या ठिकाणी संपन्न झाला.
पुणे क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये, निदेशिका डाक सेवा पुणे क्षेत्र सिमरन कौर व अहमदनगर विभागाच्या अधीक्षका हनी गंजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
यामध्ये उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख, जामखेडचे पोस्टमास्तर अविनाश ओतारी, पोस्टमास्तर बळी जायभाय, जगदीश पेनलेवाड,नान्नज चे पोस्टमास्तर बाळ राजे वाळुंजकर, डाक आवेक्षक सुनील धस, अशोक बंडगर, विवेक कुलकर्णी तसेच योगेश नलगे यांना बक्षीस मिळाले.
यासोबत विमा प्रतिनिधी मध्ये सुरज तोरडमल व मंजुषा खरात यांना देखील बक्षीस मिळाले.
यामध्ये अविनाश ओतारी यांना वेगवेगळ्या प्रकारचे तीन बक्षीस मिळाले तर बळी जायभाय यांना वेगवेगळ्या प्रकारचे दोन बक्षीस मिळाले.
यावेळेस अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. बक्षीस म्हणजे आमच्या पाठीवर कौतुकाची थाप व जबाबदारी वाढवणारे आहे असे बळी जायभाय यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या वार्षिक बक्षीस पुरस्कार वितरण सोहळ्यास अहमदनगर विभागातील अनेक डाक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.