*पुणे येथील हिसोवा कंपनी यांच्या सी एस आर निधी अंतर्गत उर्मी संस्थेच्या मार्फत निवारा बालगृहातील अनाथांना दिली मायेची उब …….*

जामखेड प्रतिनिधी,

22 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा समता भूमी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी चालू असलेल्या निवारा बालगृहातील अनाथ निराधारांना झोपण्यासाठी 44 बेड व दोन महिने पुरेल एवढा अन्नधान्य किराणा हिसोवा (vo) या कंपनीच्या सी एस आर फंड यांनी नीधीतुन उर्मी संस्थे मार्फत मदत करण्यात आली.

गेली नऊ वर्षापासून चालू असलेल्या निवारा बालगृहामध्ये 85 अनाथ, निराधार, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, लोक कलावंत, यांच्या मुला-मुलींचे शिक्षण व संगोपन लोकवर्गणीतून व लोकसहभागातून केले जात आहे याची जाणीव ठेवून या बालगृहाचे खरे वास्तव्य जाणून घेण्यासाठी पुणे येथील उर्मी संस्थेचे पदाधिकारी मा .राहुल शेंडे साहेब यांनी निवारा बालगृहास भेट दिली आणि खरंच या ठिकाणी कशाची गरज आहे, हे पाहून या निराधारांना झोपण्यासाठी डबल स्टेपचे 44 बेड म्हणजे 88 मुलां-मुलींना झोपण्याची व्यवस्था होईल या पद्धतीचे बेड उपलब्ध करून दिले व मुलांना दररोजच्या जेवणासाठी लागणारा अन्नधान्य व किराणा हा दोन महिने पुरेल एवढा देण्यात आला.

यावेळी या वस्तूचा लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम मा. राहुल शेंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला.

यावेळी ज्या हिसोवा कंपनीने सी एस आर मधून या वस्तू दिल्या या कंपनीचे मा.सौम्य बक्षी साहेब, शशिकांत चव्हाण सर, रोहित वाकळे सर,साजिद खान, देविदास गोरे,सागर अष्टेकर,संतोष नवलाखा, शुभम बनकर, प्रमोद वाघ, सागर वलुसा, रवी शिंदे, दिलीप तिडके, सुनील जगताप, विजय आहुजा, संदीप वडे, डिशेना पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या वेळेस हिसोवा कंपनीचे एच आर मॅनेजर फायनन्स मा.शिवकांत चव्हाण बोलताना म्हणाले की खरचं पहिल्यांदा उर्मी संस्थेचे आभार मानतो की ज्यांनी आम्हाला मदतीची योग्य दिशा दिली ज्या दुर्गम भागातील मराठवाड्याच्या सीमेलगत असलेले निवारा बालगृह की ज्या ठिकाणी कोणाचीही मदत पोहोचत नाही. आणि खरे गरजवंत आहे त्या ठिकाणी आम्हाला पोहोचल्याबद्दल, मी आल्यापासून या लहान गोंडस मुलांकडे बघत आहे की त्यांच्या या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नाही खरंच आमचे देखील मन भरून आले कारण उपाशीपोटी असलेल्या माणसाला पोट भरून जेवण दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती किती आनंद असतो हे आम्हाला आज प्रत्यक्षात या लेकरांच्या चेहऱ्यातून पाहावयास मिळाले.

पुणे येथील उर्मी संस्थेचे मा. राहुल शेंडे साहेब बोलताना म्हणाले की माझे जे काम होते की खरंच गरजूवंतां पर्यंत तुम्हाला पोहोच करायचे ते मी पूर्ण केले. कारण की ज्या वेळेस मी बालगृहास भेट दिली त्याच वेळेस मी ठरवलं होतं की आपण या अनाथ,निराधारांना मदत करायचीचं त्याच काळात हिसोवा इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या पदाधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली आणि माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांनी या ठिकाणी मदत केली मी ही कंपनीचे मनापासून स्वागत करतो तसेच उर्मी, हिसोवा, निवारा बालगृह, आपण यापुढे तिघे देखील हातात हात घालून पुढील काम करूयात.

ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह संस्थेचे संस्थापक ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ज्या अनाथ, निराधारांना आई-बाबाच्या, गोदडीची देखील उब आणि माया काय असते ही माहीत देखील नाही ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये झोपण्यासाठी गादी देखील पाहिलेली नाही त्यांचे बेडवरती झोपण्याचे स्वप्न पूर्ण केले त्याबद्दल हिसोवा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व उर्मी संस्था व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक करतो आणि मी कंपनीचा आमी उर्मी संस्थेचा कायम ऋणी राहील असे ते बोलताना म्हणाले.

यावेळी संस्थेचे संचालक बापूसाहेब ओहोळ यांनी प्रास्ताविक केले व संतोष चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,

या कार्यक्रमासाठी कंपनीचे सर्व पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आभार वैजीनाथ केसकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *