लेहनेवाडी ते जामखेड शिवरस्त्याला मिळाला ग्रामीण दर्जा

विधान परिषदेचे सभापती प्रा. ना. राम शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

लेहनेवाडी ते जामखेड शिवरस्त्याला मिळाला ग्रामीण दर्जा

शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या दळणवळणाचा प्रश्न मिटला

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड तालुक्यातील रा. म. मा. 548 ते जामखेड ते लेहनेवाडी या तीन किमी अंतराच्या रस्त्याला आता ग्रामीण रस्त्याचा दर्जा मिळाला आहे. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. ना. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून हे मोठे काम मार्गी लागले आहे. या रस्त्यामुळे दळणवळण वाढणार असून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेने आता सोईस्कर होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सभापती प्रा. ना राम शिंदे यांचे अभिनंदन होत आहे.
लेहनेवाडी ते जामखेड हा रस्ता रस्ते विकास योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे.

त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे ना हरकत पत्र देखील प्राप्त झाले होते. सभापती प्रा. ना. राम शिंदे यांनी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले. सभापती प्रा.ना. राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे रस्ते विकास योजनेत या रस्त्याचा समावेश करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आता हा रस्ता विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्यापासून जवळच कृषी उत्पन्न बाजार समितीचे 15 एकर क्षेत्र आहे.या ठिकाणी कांदा मार्केट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीमाल आणि कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या दळणवळणाचा प्रश्न मिटणार असून शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

चौकट
लेहनेवाडी ते जामखेड रस्त्यालगत कृषी उत्पन्न बाजार समितीची 15 एकर जागा आहे त्या ठिकाणी कांदा मार्केट उभारण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे कांदा मार्केटला कांदा आणणे शेतकऱ्यांना सोपे होणार आहे. हा एक प्रकारे जामखेड शहराच्या बाहेरून मिनी बायपास होणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. ना. राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.
—- शरद कार्ले
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles