विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत-जामखेडमध्ये १३ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली,राष्ट्रभक्तीचा जागर घडविणाऱ्या विविध रॅलींमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत-जामखेडमध्ये १३ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली,राष्ट्रभक्तीचा जागर घडविणाऱ्या रॅलींमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा

   जामखेड –
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी कर्जत व जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी भव्य तिरंगा रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासोबतच तिरंग्याप्रती सन्मान व राष्ट्राभिमान जागविण्याचा संदेश दिला जाणार आहे.
    कर्जत तालुक्यातील राशीन येथे सकाळी ९.३० वाजता भव्य तिरंगा पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये सभापती प्रा. राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.   त्यानंतर सकाळी १०.४५ वाजता कर्जत शहरात भव्य तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीतही सभापती प्रा. राम शिंदे सहभागी होणार आहेत.
    तसेच, दुपारी ३.०० वाजता जामखेड येथे भव्य तिरंगा दौड रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीतही सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिक, युवक, विद्यार्थी, विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि देशप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत. कर्जत-जामखेड परिसरात आयोजित या तिरंगा रॅलींमधून ‘हर घर तिरंगा’ आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
   या भव्य रॅलींमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन तिरंग्याचा सन्मान राखत राष्ट्रभक्तीचा जागर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. युवक, महिला, विद्यार्थी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या राष्ट्रभक्तीपर उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
            *रॅलींचे वेळापत्रक*
– सकाळी ९.३० वा. – राशीन येथे भव्य तिरंगा पायी रॅली
– सकाळी १०.४५ वा. – कर्जत शहरात भव्य तिरंगा मोटारसायकल रॅली
– दुपारी ३.०० वा. – जामखेड येथे भव्य तिरंगा दौड रॅली

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles