जामखेड येथे “शेतकरी भवनाचे” विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार लोकार्पण
सोहळ्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सभापती पै शरद कार्ले यांचे आवाहन
जामखेड प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १,२७,८४,०१७ रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचा लोकार्पण सोहळा तसेच राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगांव दाभाडे व जामखेड कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक लिंबू, कांदा, उडिद व सोयाबीन लागवड आणि काढणी पश्चात व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आला असून तालुक्यातील शेतकरी बांधवानी या कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै शरद कार्ले यांनी केले आहे.
बुधवार दि. २२ दुपारी १२.३० वा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होत असते या सोहळ्यात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या शुभहस्ते या शेतकरी भावनांचे लोक अर्पण होणार आहे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य, पुणेचे पणन संचालक शरद जरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी संस्था अहिल्यानगरचे जिल्हा उपनिबंधक, मंगेश सुरवसे, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकुमार प्रकाश गोरे, सर्व संचालक गौतम उतेकर, विष्णु भोंडवे, सचिन घुमरे, नारायण जायभाय, सुधीर राळेभात, सतिष शिंदे, राहुल बेदमुथ्था, सुरेश पवार, अंकुश ढवळे, गणेश जगताप, वैजीनाथ पाटील, सिताराम ससाणे, रतन विठ्ठल चव्हाण, अनिता गजानन शिंदे, रविंद्र हुलगुंडे, कैलास वराट, सचिव दिलीप तिजोरे, कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेड तथा सहाय्यक निबंधक, सह. संस्था जामखेड सर्व कर्मचारी वृंद उपस्थित राहणार आहेत तरी या लोकार्पण सोहळ्यासाठी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सभापती पै शरद कार्ले यांनी केले आहे.
तसेच सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० वाजताचे दरम्यान जामखेड तालुक्यातील लिंबू, कांदा, उडिद व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेतीसाठीचे योग्य तंत्रज्ञान मिळावे व त्यांच्या मालाला योग्य बाजार भाव मिळावा यासाठी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगांव दाभाडे व जामखेड कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक लिंबू, कांदा, उडिद व सोयाबीन लागवड आणि काढणी पश्चात व्यवस्थापन कसे करावे यासाठी बाजार समिती कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी बाजार समिती आवारात एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै शरद कार्ले यांनी केले आहे.
![]()



