Home राजकीय बातमी तपनेश्वर शाळेला शिवसेनेकडून प्रथमोपचार किटचे वाटप

तपनेश्वर शाळेला शिवसेनेकडून प्रथमोपचार किटचे वाटप

0
3

*आरोग्य हीच खरी सेवा; जामखेडमध्ये वैद्यकीय कक्ष लवकरच : आकाश बाफना*

तपनेश्वर शाळेला शिवसेनेकडून प्रथमोपचार किटचे वाटप

जामखेड, प्रतिनिधी :

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांमध्ये प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक असून, आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास प्रथमोपचार किटमुळे तातडीने मदत मिळू शकते. या उद्देशाने जामखेड तालुक्यातील शाळांना प्रथमोपचार पेट्यांचे वाटप सुरू करण्यात आहे , अशी माहिती युवा नेते आकाश बाफना यांनी दिली.

शिवसेना महाराष्ट्र राज्याचे पक्ष सचिव राम रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा नेते आकाश बाफना यांच्या संकल्पनेतून तसेच सामाजिक कार्यकर्त्या पायलताई बाफना मित्र परिवार आणि शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले व मुली) येथे प्रथमोपचार पेट्यांचे मंगळवार दिनांक २८ जुलै रोजी वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आकाश बाफना म्हणाले,पुढील काळात जामखेड शहरासह तालुक्यात आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठी जामखेड शहरात लवकरच शिवसेना वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार,शिवसेना नेते पांडुरंग माने, स्वप्निल खाडे, विकी पिंपळे, अशोक कुमटकर, दत्तात्रय जगताप,ज्येष्ठ शिक्षिका जयश्री मुकणे, मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे, उपाध्यापिका जयश्री पाटील, मंगल सोलंकर, माता-पालक रेखा बळे, पूजा कुलकर्णी,गीता जिरेकर, कविता भोसले, नीता भोसले, शितल क्षिरसागर,व अंगणवाडी सेविका शुभांगी अडाले, शिवकन्या राजगुरू तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार यांनी केले.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page