राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित कालिका पोदार लर्न स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित कालिका पोदार लर्न स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न*

जामखेड प्रतिनिधी,

जागतिक विज्ञान दिनानिमित्त कालिका पोदार लर्न स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जामखेड चे तहसीलदार मा.श्री गणेश माळी साहेब यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे सेंट्रल महाराष्ट्राचे एरिया सेल्स मॅनजर मा.श्री.योगेश राऊत सर हे ही या प्रसंगी उपस्थित होते.या प्रदर्शनात इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे आयोजन केले होते.

यामध्ये सिंचन प्रकल्प,स्मार्ट सिटी,अनुविद्युत प्रकल्प,स्वयंचलित टुलगेट,ऑर्गनसिस्टीमचे वेगवेगळे प्रकल्प,कार्बन प्युरीफिकेशन प्रकल्प, सोलरपॉवर स्टेशन आणि हॉलोग्राम,ड्रेनिज सिस्टम, चंद्रयान प्रकल्प,ध्वनीचे प्रवर्तन, मानवी श्वसन उच्छ्वास यांचे प्रतिकृती असणारी फुफ्फुसांचे कार्य यासारखे प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात आले होते.

विज्ञान प्रयोगासाठी वापरण्यात येणारी उपकरणे, सुक्ष्मदर्शक यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विविध प्रकारे मांडणी करण्यात आली होती. यासाठी विज्ञान विभागातील शिक्षकांनी सहकार्य केले. तसेच, गणित व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचेही विविध प्रकल्प ही या प्रदर्शनाचे आकर्षन ठरले.

याच्यासह अन्य विषयांवर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रकल्पाचे विश्लेषण देत असताना परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उतरे देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासू तसेच जिज्ञासू वृत्तीची चुनूक दाखवून दिली.

यावेळी बोलताना तहसीलदार गणेश माळी हे म्हणाले की शाळेचा हार्दिक उपक्रम छान असून मुलांनी खूप छान प्रयोग केले आहेत आणि त्या प्रयोगविषयी सर्व ज्ञान आत्मसात केले आहे शाळेचे अभिनंदन.

या प्रदर्शनात शाळेतील पाचवी ते नववीतील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी तसेच पालकांनी घेतला. प्रदर्शनासाठी लागणारे मार्गदर्शन व सहकार्य शाळेचे ट्रस्टी श्री. सागर अंदुरे आणि श्री निलेश तवटे यांच्यासह मुख्याध्यापक श्री प्रशांत जोशी व सर्व शिक्षकांनी केले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page