राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या वतीने पत्रकार परिषद….
जामखेड प्रतिनिधी,
आज जामखेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या वतीने तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांच्या अध्यक्ष्याखाली पत्रकार परिषद पार पडली…
यावेळी बोलताना गोलेकर म्हणाले की,कोणी कोठेही गेले तरी पक्षाला व आ रोहित पवार यांना फरक पडणार नाही, मुद्दा दुसरा असा की आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष पद होते आपण मतदार संघात कुठे फिरलात कोणत्या गावात गेलात पक्षासाठी काय केलं ते सांगा.. आबांना विकासावर बोलण्याचा अधिकार नाही आपण जिल्हा परिषद सदस्य असताना आपण किती विकास केला ते जनतेला सांगावे…आणि जे सुपारीबाज असतील त्यांना राग येईल बाकीच्यांना राग येण्याचं काहीही कारण नाही.
यावेळी दत्तात्रय वारे म्हणाले की,आमचा पैलवान निवडणुकीच्या एखाड्यात तयार आहे पुढचा पैलवान संब्रमात आहे…मी आबा आणि कोठारी आम्ही पवार साहेबांकडे आग्रह धरून रोहित दादांना उभं करून निवडून आणलं.आणि इथून पुढेही जनता रोहित दादांबरोबर राहणार आहे..
यावेळी बोलताना सूर्यकांत मोरे म्हणाले की, आमचा उमेदवार लोकांभिमुख आहे जनता रोहित पवार यांच्या सोबत आहे त्यामुळे काहीही टीका केली तरी काही फरक पडत नाही…आबांना थांबण्याचा रोहित दादांनी खूप प्रयत्न केला मला निरोप घेऊन पाठवलं आमची दोन तास चर्चा झाली अजून चालू आहे पाहून काय होतंय ते.
या पत्रकार परिषदेवेळी तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, जेष्ठ नेते पोले नाना,माजी सभापती सूर्यकांत मोरे,माजी जी प सदस्य शहाजी राळेभात, संचालक कृ. उ. बाजार समिती सुधीर राळेभात, उपसभापती कृ. उ. बाजार समिती कैलास वराट,युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात,सरपंच हनुमंत पाटील, युवा नेते रमेश आजबे,युवक शहराध्यक्ष वशिम शेख,शरद शिंदे, तालुकाध्यक्ष अल्पसंख्यांक उमर कुरेशी,कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,सरपंच सागर कोल्हे,प्रसिद्धी प्रमुख काकासाहेब कोल्हे,युवक कार्याध्यक्ष रामहरी गोपाळघरे,अनिल रेडे, सह कार्यकर्ते उपस्थित होते