रत्नदीप संस्थेचे डॉ.भास्कर मोरे यांच्या विरोधात दुसर्या दिवशी आंदोलन
जामखेड प्रतिनिधी –
रत्नदीप मेडिकल फौडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या मनमानीला कंटाळून विद्यार्थीचे आंदोलन दुसर्या दिवशी झाले. उपविभागीय अधिकारी सायली सोळंकी यांनी विद्यार्थी व संस्थेचे अध्यक्ष व प्रशासनाशी चर्चा केली. तसेच काही मुद्दे विद्यापीठ कुलगुरू यांना पाठवले असून वरीष्ठांना अहवाल पाठवला आहे.
विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने दि ७ रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पदाधिकारी, धारकरी विद्यार्थींसमवेत आमरण उपोषणास बसणार आहेत.रत्नदीप शैक्षणिक संस्थेच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले ते दुसर्या दिवशी बुधवारी चालू राहीले. प्रशासनाने बुधवारी विद्यार्थी व संस्था चालक डॉ. भास्कर मोरे यांना उपविभागीय अधिकारी सायली सोळंके तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चर्चेसाठी बोलवले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टर भास्कर मोरे हे जो पर्यंत तहसील कार्यालयाच्या परीसरात आमच्याशी चर्चा करण्यासाठी येत नाहीत तो पर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आसे सांगुन डॉ मोरे यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.
अखेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी डॉ. भास्कर मोरे यांना चर्चासाठी विद्यार्थीसमोर आणले. विद्यार्थींच्या प्रश्नांच्या आनुशंगाने बोलण्यास सांगितले मात्र विद्यार्थींना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने विद्यार्थी आक्रमक झाले व गोंधळ उडाल्याने सुरु असलेली चर्चा थांबली होती.
उपविभागीय अधिकारी सायली सोळंकी यांनी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्याबरोबर तहसीलदार, पोलीस निरीक्षक काही कार्यकर्ते व संस्थाचालक यांच्याबरोबर चर्चा करून स्थानिक पातळीवरील विषय एकमत झाले. तसेच विद्यार्थीनी बरोबर एकांतात चर्चा करून विषय समजावून घेतला व त्याचा सविस्तर अहवाल वरीष्ठांना पाठवण्यात येईल असे पत्रकारांना सांगितले.