रात्री उशिरा जामखेड पोलीस स्टेशनला रत्नदीप
मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे वर
गुन्हा दाखल…..

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव हे पुढील तपास करणार !

जामखेड प्रतिनिधी-

तीन दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू होते. या आंदोलनाला मनसे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पक्ष यांच्या सह
अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता.

कालपासून तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व विद्यार्थी उपोषणाला बसले होते. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत मुलींच्या तक्रारी साठी महिला साहाय्यक पोलीस
निरीक्षक अधिकारी नियुक्ती केली होती. तरीही विद्यार्थी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलनावर ठाम होते. तेव्हा रात्री उशिरा जामखेड पोलीस स्टेशनला मोरेवर गुन्हा दाखल झाला आहे.

आंदोलन कर्त्याशी चर्चा करण्यासाठी काल उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, उपविभागीय
पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे यांनी भेट दिली व प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या होत्या. तसेच मुलींच्या तक्रारी साठी महिला साहाय्यक पोलीस
निरीक्षक अधिकारी नियुक्ती केली होती.

तरीही विद्यार्थी गुन्हा दाखल करण्यासाठी ठाम होते तेव्हा रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. रत्नदीप
मेडिकल फाउंडेशनच्या एका विद्यार्थीनीने भास्कर मोरे विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

यात म्हटले आहे की, भास्कर मोरे पाटील यांनी फिर्यादी यास कॉलेजचे प्रिन्सिपल ऑफिस मध्ये बोलावून घेऊन सदर ऑफिसच्या अँटी चेंबर मध्ये फिर्यादीस लज्जा उपत्न होईल असे कृत्ये करतात.

अश्लिल चाळे करतात. अशी फिर्याद एका कॉलेजच्या विद्यार्थिनीने दिली आहे. यानुसार जामखेड पोलीस पुढील तपास करत आहेत. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत.
रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष
डॉ. भास्कर मोरे वर अखेर गुन्हा दाखल…

उपोषणकर्ते काही मुलींची प्रकृती खालवल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे ऍडमिट करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *