*रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत बैठक*

काल रास्ता रोको आंदोलनाचा देण्यात आला होता इशारा.

जामखेड प्रतिनिधी

रत्नदीप कॉलेजमधील नर्सिंगच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन या सरकारी संस्थेच्या नोडल ऑफिसर जोल्या बुधगावकर पा विद्याध्यांचे प्रश्न सोडविण्यात ऐवजी रत्नदीप कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे व संचालकांशी संगनमत करून विद्यार्थ्यांची अडवणूक करत असल्याचा आरोप करत

जामखेड तालुका शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सकल मराठा या संघटनांसह विविध पक्षसंघटना, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी आज दि. ३० रोजी बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्याचा इसारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर अंदोलनाचा इशारा दिलेल्या संघटनांचे प्रतिनिधी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत तसेच संबंधित विद्यापीठांचे अधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सीगव्दारे लावलेली उपस्थित या सर्वांची तहसील कार्यालयात एक बैठक पार पहली व त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रांसंदर्भात मार्ग निघाल्याने आज रोजी करण्यात येणारे बेमुदत रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या महाराष्ट्र राज्य नर्सिंग अँड पॅरामेडिकल  इज्यूकेशन बोर्ड अंतर्गत असणाऱ्या नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यानच्या पिळवणूकी विरोधात आज दि. ३० रोजी सर्व विद्यार्थी, पामस्थ व विविध पक्षसंघटनाचे प्रतिनिधी तहसिलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील तसेच महाराष्ट्र राज्य नर्सिंग अँड पॅरामेडिकल बोर्ड मुबंईचे संचालक व्हिडीओ कॉन्फ्रास व दूरध्वनीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.या सर्वांच्या उपस्थितीत जामखेड तहसील कार्यालयात संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे आण्णासाहेब सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या व आंदोलनाची भूमीका सविस्तरपणे मांडली. तसेच रत्नदीप नर्सिंग कॉलेज विद्यार्थ्यांनी सर्व अडचणी त्यांच्या समोर मांडल्या. यावेळी रत्नदीप कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे हे अर्थिक हेतूने आमचे परीक्षा फॉर्म भरून घेत नाहीत.

अर्थिक पिळवणूक करत आहेत. आम्ही यापुढे त्या कॉलेजमध्ये अजीबात पाऊल ठेवणार नाहीत. आशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. तसेच या समस्येवर तत्काळ उपाययोजना करण्याची विनंती तहसिलदारांना  ग्रामस्थांनी केली. यावर महारष्ट्र राज्य नर्सिंग अँड पॅरामेडिकल बोर्ड मुंबईचे संचालक यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना लगेच विशिष्ट ईमेल आय. डी. उपलब्ध करून देऊन त्याव्दारे परीक्षा फॉर्म भरण्याची व्यवस्था करून दिली.

तसेच विद्यार्थ्यांच्या इतर सर्व अडचणी सोडविण्याचे तहसिलदार गणेश माळी यांच्या यांच्याकडे लेखी आश्वासन सपुर्द केले. या सर्व चर्चा, नियोजन व उपाययोजन यथा योग्य व समाधानकारक वाटल्याने आज दि. ३० मार्च रोजी होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडूराजे भोसले, मनसेचे प्रदिप टापरे, आरपीआय चे नेते सुनील साळवे, सामाजिक कार्यकर्ते केदार रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते शहाजी राळेभात, प्राचार्य विकी घायतडक, रमेश अजबे, डॉ. कैलास हजारे, काका चव्हान, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *