*आ.रोहीत पवार यांच्यापुढे विद्यार्थ्यांनी
डॉ.भास्कर मोरेच्या कृत्यांचा वाचला पाढा*

जामखेड प्रतिनिधी,

हे अंदोलन तुमचे आहे. या आंदोलनाचे राजकारण केले जाऊ नये यासाठी मी सुरुवातीला आलो नाही. मात्र माझ्या पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या होत्या तसेच पोलीस प्रशासन व विविध विद्यापीठांचे कुलगुरु तसेच आवश्यक त्या जबाबदार अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवून त्यांना योग्य त्या सुचना देण्यात येत होत्या. यापुढे मी एक मोठा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी राहील असे सुतोवाच आ.रोहित पवार यांनी यावेळी केले.

रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरेचे कुकृत्य एखाद्या सैतानला लाजवेल असे असून त्याने केलेल्या शारीरिक व मानसिक, अर्थिक छळ मुळे अनेक मुले मुली नैराश्याच्या गर्तेत सापडली असून भास्कर मोरेला अटक न केल्यास आमच्या जीवीताला धोका
असल्याच्या भावना व्यक्त करत आमचे दुसऱ्या मेडिकल कॉलेजकडे ट्रान्स्फर अन्यायकारक रितीने घेतलेले पैसे परत करणे व भास्कर मोरेला अटक करूनआम्हाला न्याय द्यावा अश्या मागण्या सर्वच विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

कर्जत जामखेडचे आमदार आ. रोहीत पवार यांनी रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या विविध फॅकल्टीच्या शेकडो अंदोलकांची अंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली व त्यांच्या भावना जाणून घेतल्या. व त्यांचा योग्य न्याय दिला जाईल असा विश्वास दिला. तसेच उपस्थित पोलीस अधिकारी, तहसीलदार,वनविभागाचे अधिकारी, आलेली आरोग्य विद्यापीठाची समीती यांना योग्य त्या सुचना दिल्या.

तुमचा मोठा भाऊ म्हणून सदैव पाठिशी आ. रोहीत पवार यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या तिव्र भावना व्यक्त करताना सांगितले की, भास्कर मोरेकडून हा आम्हा विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक,अर्थिक छळ केला जातो. जनरल,युनिफॉर्म, बसभाडे, मेस, वसतीगृह
यासाठी अमाप पैसा वसूल करतो,याठिकाणी पुरेसे शिक्षक नाहीत.

प्रैक्टिकल नाही. S. C. ची पुर्ण स्कॉलरशीप घेतली जाते.इन्टरशिपसाठी हॉस्पिटल नाही. स्टाफ,
पेशंट, रिसेप्शन म्हणून मुलांनाच पुढे केले जाते. सनासुदीला सुट्टी दिली जात नाही. स्टुडंट नाही तर लेबर म्हणून राबवले जाते. महापुरुष जयंती साजऱ्या होत नाहीत. बी. ए. एम.एस. ३ तिनच विद्यार्थीनी आहेत.त्यांना बी. एच. एम. एस. मध्ये बसवले जाते.

गैरहजर दाखवून परिक्षा फॉर्म भरले जात नाहीत. चार-चार वर्षे पहिल्या वर्षांतच बसवले जाते. एकही चाप्टर झालेले नाहीत. हॉस्टेल मध्ये बेडवर येऊन बसतो. वैवाहिक मुलींना वर्गात खाजगी प्रश्न विचारतो, एक दिवसाचा ५ मिनिटांचा ३००० रुपये दंड वसूल केला जातो.

पैसे भरले नाहीत तर भिक मागा म्हणतो. मी बापासारखा आहे. म्हणून फ्लट करतो.आजही मुली दोनतीन मुली डिप्रेशन मध्ये आहेत. जर आम्ही ट्रान्स्फर न केल्यास आत्महत्या करावी लागेल.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या अनेक तक्रारींचा पाढाच विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी वाचला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्षपांडुराजे भोसले, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी या अंदोलनास पाठींबा दिलात्याबद्दल आ. रोहीत पवार यांनी सर्वाचे आभार मानले.

यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांतखैरे, उपविभागीय पोलीसअधिकारी विवेकानंद वाखारे,तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या सहमहसूल,पोलीस,वनविभाग,आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी. विविध पक्ष संघटनांचेपदाधिकारी, कार्यकर्ते, शेकडो अंदोलक, धारकरी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुलींनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येतील असेआश्वासन देण्याबरोबरच दाखल गुन्ह्यात डॉ. भास्कर मोरेला लवकरात लवकर अटक करण्यात येईल. तसेच पोलीस प्रशासन अंदोलनकर्त्या
मुला-मुलींसोबत असेल असे आश्वासनही पोलीस
प्रशासना अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *