प्रा. सचिन सर गायवळ यांच्याकडून खर्डा येथील गोरक्षनाथ गुरुकुल व कै. कस्तुरबाई भैसडे मठास आठ फॅन 9 एलईडी लाईटची भेट..
(खर्डा प्रतिनिधी)
याबाबत माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन सर गायवळ यांच्याकडून खर्डा येथील गोरक्षनाथ गुरुकुल व कै. कस्तुरबाई भैसडे मठास चार नवीन फॅन व नऊ एलईडी लाईटची भेट पागल बाबा (रामदास महाराज) यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी पत्रकार दत्तराज पवार,बापू कदम सर,उध्दव हुलगुंडे व बाबांचे भक्तगण उपस्थित होते.
एक वर्षांपूर्वी काही कै.कस्तुरबाई भैसडे मठामध्ये धूनी प्रज्वलित होम सुरू करण्यात आला होता, त्याला एक वर्षपूर्ती झाल्यामुळे येथील भक्तगण, महिला व ग्रामस्थांनी गावातून गोरक्षनाथांच्या फोटोची मिरवणूक काढण्यात आली होती.
कै.कस्तुरबाई मठात लहान मुलावर धार्मिक संस्कार होण्यासाठी गोरक्षनाथ गुरुकुलची स्थापना करण्यात आली आहे या ठिकाणी सध्या 42 विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश घेतला असून ही लहान मुले भगवत गीतेतील सर्व स्त्रोत तोंडपाठ म्हणून दाखवत आहेत.
दर अमावस्याला मठात अनेक भाविक भक्त (रामदास महाराज)पागल बाबांकडे जीवनातील समस्येबाबत व अडचणी सोडविण्यासाठी येत आहेत अनेक तरुणांचे दारूचे व्यसन बाबांनी सोडविले आहे. त्यामुळे अनेक घरातील संसार सुख समाधानात होण्यास मदत होत आहे, त्यामुळे भक्तांची प्रचंड गर्दी मठामध्ये बाबांचे दर्शन घेण्यासाठी होत आहे. नंतर भक्तांना महाप्रसादाचे अन्नदान करण्यात येते. मठात सकाळी व संध्याकाळी दररोज आरतीचा कार्यक्रम घेतला जातो. मठा शेजारी पागल बाबा व राम भक्तांनी मोठे राम मंदिर लोक वर्गणीच्या माध्यमातून उभारले जात आहेत.
प्रा. सचिन सर गायवळ यांनी धुनी प्रज्वलित होम एक वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ सामाजिक जानीवेतून अन्नदान करून मठाला आठ मोठे फॅन व परिसरात लाईट उजेडाची व्यवस्था करण्यासाठी नऊ एलईडी फोकस भेट दिले आहेत. यावेळी भक्तगण मठाचे भक्तगण व महिलांनी सचिन सर गायवळ यांचे आभार मानले.
याप्रसंगी मठाचे रामभक्त, महिला भगिनी व खर्डा ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.