*अखेर मृत्यूशी झुंज संपली, संदेश कोठारी यांची प्राणज्योत आज मालवली*
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड शहरातील सर्वांचे परिचित व सर्वांच्या मदतीला धावून येणारे जामखेडचे माजी सरपंच सुनिल कोठारी यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांचे चिरंजीव संदेशशेठ कोठारी यांचा उपचारादरम्यान तिव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी गुरुवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर जळगाव- चांदवड राज्य मार्गावरील हिंगोणे गावानजीक वळणावर त्यांची चारचाकी गाडी उलटल्याने एक जागीच ठार, तर तीनजण जखमी झाले. जखमींपैकी संदेश कोठारी हे गंभीर जखमी झाले होते. तेंव्हापासून त्त्यांचेवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या मृत्युमुळे कोठारी परिवारा सह संपुर्ण जामखेड शहरावर शोककळा पसरली आहे. संदेशशेठ कोठारी यांच्या मृत्युमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वी गुरुवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर जळगाव- चांदवड राज्य मार्गावरील हिंगोणे गावानजीक झालेल्या अपघातात एक जागीच ठार, तर तीनजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली होती. यामध्ये अरुण मोरे (४५, रा. घोगरगाव,) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर संदेश सुनील कोठारी (३९), रसिकलाल मोहनलाल बोथरा (४५), सुजित सुनील अवसरकर (३७, तिघे रा. जामखेड यांच्यावर चाळीसगावला खासगी रुग्णालयात होते.
त्यापैकी आज दि. २५ नोव्हेंबर रोजी संदेश कोठारी यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
गुरुवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर जामखेड ता. जामखेड येथील रहिवासी चारचाकी गाडीने क्रमांक एम.एच. १६ सी.व्ही. २२७७ जळगाव येथून जामखेड येथे येत होते. दरम्यान, हिंगोणे (ता. चाळीसगाव ) जवळील वळणावर अचानक आलेल्या खराब रस्त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने गाडी उलटून झाडावर आदळली.गाडी झाडात अडकल्याने यातील प्रवाशांना बाहेर काढता येत नव्हते.
दरम्यान, खासदार उन्मेष पाटील चाळीसगावकडे जात असताना ते घटनास्थळी थांबले. तत्काळ चाळीसगाव येथून रुग्णवाहिका व कटर मागविले. गाडी कापून जखमी प्रवाशांना बाहेर काढले होते.
संदेश कोठारी यांच्या मृत्युमुळे जामखेड शहरावर शोककळा पसरली असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांना विविध पक्ष, संघटना, मित्रमंडळे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. तसेच संदेश कोठारी यांचे चुलते सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व वडील माजी सरपंच सुनील कोठारी यांच्या सामाजिक कामातून अनेकांचे प्राण वाचले आहेत तर सुनील कोठारी यांच्या सामाजिक कामामुळे अनेकांचे संसार उभे राहिले आहेत. त्यांच्याबाबत असा प्रसंग घडायला नको होता अश्या भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत. तसेच सुनील कोठारी यांचे पत्रकारिता क्षेत्रातही मोठे योगदान आहे.
त्यामुळे जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनेही संदेश कोठारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.