सभापती शरद कार्ले व व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कांद्याला मिळणार वाढीव भाव, जामखेड बाजार समितीतून कांदा जाणार दुबईच्या बाजारात

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले हे अनेक उपाययोजना अमलात आणत असून. तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा आता दुबईला जाणार आहे. यासाठी त्यांनी कडा येथील प्रसिद्ध कांदा व्यापारी यांच्या माध्यमातून तशी सोयच केली असून यासाठी आलेल्या कंटेनरची पुजा करून त्यात कांदा भरण्यात आला. आज रोजी या कंटेनर मधून ३० टन कांदा दुबईकडे जाणार आहे. या कांदा निर्यातीतून शेतकऱ्यांच्या कांद्याला अधिकचा भाव मिळणार आहे.

त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कांदा नगर सोलापूर येथे न नेता जामखेड बाजार समिती आवारातील
अलंकार ट्रेडर्स येथे विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे.

यावेळी बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, संचालक डॉ. गणेश जगताप, राहुल बेदमुथ्था, सचिन घुमरे, कांदा व्यापारी आबुशेठ बोरा, पिंटूशेठ खाडे, हनुमंत खैरे, दादा काळदाते, कृष्णा खाडे, मारूती काळदाते, पप्पूशेठ काशीद, कर्मचारी धोंडूराम कवठे, मारूती जाधव आदी मान्यवरांसह व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्यातील शेतकऱ्यांमार्फत अनेक सुविधा पुरवण्यात येत असून या माध्यमातून खर्डा येथे गोडाऊन, शेळ्यांचा बाजार, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याचा फायदा घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली प्रगती करावी असेही आवाहन सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *