सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची पुलावरून पडलेल्या मृत वारकऱ्यास मदत

जामखेड प्रतिनिधी

जामखेड पासून सहा किलोमीटर अंतरावर मोहा गावाजवळ वाटसरू पायी चालणाऱ्या वारकऱ्याचा पुलावरून पडून मृत्यू झाला घटनेची माहिती पत्रकार संजय सानप आणि माऊली डोके यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली संजय कोठारी यांना माहिती कळताच कोठारी यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली सदर व्यक्ती पुलाला कठडे नसल्यामुळे खाली पडून त्याचा मृत्यू झाला असावा


कोठारी यांनी आपले मित्र संतोष सुराणा यांना बरोबर घेऊन घटनास्थळी धाव घेतली यावेळी
किशोर कोरे ,जाहीर पठाण ,संजय सानप ,ओंकार डोके, गौतम डोंगरे सुमित रेडे आदींनी मदत केली यांच्या सहकार्याने २५ फूट खोल पडलेल्या वयोवृद्ध मृत वारकऱ्यांस वर आणून आपल्या रुग्णवाहिकेत आणून ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे
चौकट
संबंधित अरुंद पुलाला कठडे नसल्याने बरेच अपघात या ठिकाणी घडलेले आहेत मी तेथून आत्तापर्यंत तीन-चार जण आणलेले आहेत त्यांना वाचवण्यात यश आले होते परंतु या वारकरी बाबाला आम्ही जायच्या अगोदरच काळाने घाला घातला होता त्यामुळे आपण त्याला वाचू शकलो नाही अशी खंत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी सदरची माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारती साहेब आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल लाटे,सचिन पिरगळ, प्रकाश जाधव हे करत आहेत

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page