मंदिराच्या कामास सडळ हाताने मदत करा- सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी
जामखेड प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ नळी वडगाव तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद येथील मंदिराचे काम पूर्णत्वास असून पैशामुळे पुढील काम राहिले आहे आम्ही तर मदत करतोच आपण पण सडळ हाताने मदत करा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले
यावेळी बोलताना वृद्धाश्रमाचे सर्वेसर्वा ह. भ. प. गहिनीनाथ महाराज लोखंडे म्हणाले सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी गेली दहा वर्षापासून आमच्या वृद्धाश्रमात मदत करत आहेत त्यांच्या प्रयत्नातून आम्हाला बोर ,तीन शेड ,पिठाची चक्की ,पाण्याच्या टाक्या , रग ,वृक्षारोपण ,अन्नधान्य आणि फरशी, खिडक्या दरवाजे असे बरेच मटेरियल आम्हाला मिळाले आहे.
काका प्रत्येक महिन्यात पंधरा दिवसाला येतात आम्हाला जेवण देतात आणि कुणाचा वाढदिवस असेल तर त्या निमित्ताने देणगी स्वरूपात देण्यास मदत करतात भूम येथील जिल्हा सत्र न्यायाधीश जयराज वडने साहेब यांच्या मार्फत मागील वर्षी ५० रग देण्यात आले होते यावेळी पण काका उपस्थित होते.
कामाच्या उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिल्ली संजय कोठारी यांच्या शुभहस्ते नारळ फोडून पुन्हा सुरू करण्यात आले यावेळी ह. भ. प. गहीनाथ महाराज लोखंडे ,अमोलशेठ लोहकरे ,विनोद तोंडे, मोहन नागरगोजे , वृद्धाश्रम मधील काही वृद्ध आदी उपस्थित होते