जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की,
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने असलेली *शेतमाल तारण योजना* जामखेड बाजार समितीमध्ये कार्यान्वित असुन या योजनेचे प्रमुख उध्दिष्ठ वारंवार कमी होणारे शेतमालाचे बाजारभाव आणि त्यामुळे शेतक-यांच होणारं नुकसान टाळणे हेच आहे, शेतमालाचा बाजारभाव कमी निघाल्यास सदरहु शेतमाल शेतक-यांना वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवण्याची सुविधा या योजनेमध्ये आहे.
आणि वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणुक केलेल्या शेतमालाची पावती बाजार समितीकडे सादर केल्यानंतर बाजार समितीच्या माध्यमातुन पणन मंडळास कर्ज पुरवठ्याची प्रक्रीया होईल,शेतक-यांना शेतमालाच्या एकुण किमतीच्या 70%कर्ज हे 6% व्याजदराने देण्यात येईल, त्यासाठी 6 महीन्याची मुदत असेल वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवलेल्या शेतमालाला एक महीन्यासाठी प्रती 50 किलोसाठी 8 रू एवढे भाडे वखार महामंडळाने निर्धारीत करून दिले आहे
परंतु
*शेतक-यांनी वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवलेल्या शेतमालाचे भाडे व ईतर खर्च हा शेतक-यांकडुन न घेता हा सर्व खर्च बाजार समितीकडुनचं केला जाणार आहे*
वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवलेला संपुर्ण शेतमाल हा विमा संरक्षित असेल आणि शेतमालाला कीड लागणार याची काळजी वखार महामंडळाकडुनच घेतली जाईल.
जामखेड तालुक्यातील सर्व शेतक-यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शेतमाल काढणीच्या ऐणवेळी आवक वाढल्यानंतर कमी होणा-या बाजारभावापासुन आपलं नुकसान टाळावं असे आवाहन जामखेड बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती मा शरद(दादा) कार्ले यांच्याकडुन करण्यात येत आहे.
सभापती
मा शरद पंडीत कार्ले
कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड
ता जामखेड,जि अ,नगर