१२४ शिक्षकांची ७७ लाखाची वैद्यकिय बीलाची रक्कम शिक्षकांच्या बँक खात्यात जमा – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे..
जामखेड – सन २०१५ पासून चे पेंडींग १२४ शिक्षकांची ७ ७ लाखांची वैद्यकीय बिलाची रक्कम शिक्षकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी दिली .
कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी पोळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांचा गेली अनेक दिवसांचा प्रश्न यामुळे निकाली निघाला आहे . १५८ वैद्यकिय देयकांना प्रशासकिय मंजूरी देण्यात आली असून उपलब्ध निधिच्या १२४ शिक्षकांची वैद्यकिय देयकाची रक्कम रक्कम सबंधिताच्या खात्यात जमा करण्यात आली असून उर्वरीत राहिलेल्या शिक्षकांची वैद्यकिय बिलाच्या रकमेची मागणी करण्यात आली असून निधी प्राप्त होताच संबंधित शिक्षकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल .
अनेक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण आहे .