चोंडी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८ वा जयंती उत्सव मोठया संख्येने उपस्थित राहावे : स्वागताध्यक्ष माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८ वा जयंती उत्सव मोठया दिमाखात व शासकीय पातळीवर होत असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, नागरी विमान वाहतुक केंद्रीय मंत्री ना. ज्योतिरादित्य शिंदे, महाराष्ट्राचे महसुल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विशेष अतिथी म्हणून श्रीमंत राजे यशवंतराव होळकर (तृतीय), होळकर संस्थान, इंदोर,मध्यप्रदेश हे उपस्थित राहणार असून या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे प्रतिपादन आवाहन
जयंती उत्सव कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी केले आहे.
या जयंती उत्सव सोहळ्यासाठी अ.नगर दक्षिण खा. सुजय विखे, शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे, आ. बाळासाहेब थोरात, आ. सत्यजित तांबे, आ. निलेश लंके, आ. आशुतोष काळे, माजीमंत्री आण्णासाहेब डांगे, आ. संग्राम जगताप आ. शंकरराव गडाख आ. बबनराव पाचपुते, आ. श्रीमती मोनिकाताई राजळे, आ. प्राजक्त तनपुरे, आ. डॉ. किरण लहामटे आ. रोहित पवार आ. शिवाजीराव कर्डिले (चेअरमन, जिल्हा सहकारी बँक), आ. दत्तात्रय भरणे, आ. अनिल गोटे, आ. रमेश शेंडगे, आ. नानाभाऊ कोकरे, आ. विजयराव मोरे, माजी मंत्री महादेव जानकर, आ. नारायण पाटील, आ. रामराव वडकुते, आ. हरिभाऊ भदे आ. लहू कानडे, विकास महात्मे, आ. गोपीचंद पडळकर, आ. प्रकाश शेंडगे यांसह आजी माजी विधानसभा सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन जयंती उत्सव कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे तसेच निमंत्रण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.