जामखेड येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त दि.१२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्मीय व सर्व पक्षीय तालुकास्तरीय आशा भव्य दिव्य सार्वजनिक जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकतीच याबाबत कार्यक्रमाच्या आयोजनाची बैठक देखील संपन्न झाली होती.
जामखेड प्रतिनिधी,
आठ दिवस चालणाऱ्या जयंती सोहळ्यात दि १२ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी पर्यंत मोफत सर्वरोग तपासणी व निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक १७ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा, दिनांक १८ फेब्रुवारी रोजी अभिनय नाट्यछटा स्पर्धा, दिनांक १९ फेब्रुवारी रोजी रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच जामखेड तालुक्यातील प्राथमिक शाळांचे महाशिव स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व ज्या महामानवांनी राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले त्यांच्या जीवनावरील प्रसंग स्पर्धेकांनकडुन सादर करण्यात येणार आहेत. रोख रक्कम, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे सर्व स्पर्धेच्या बक्षीसाचे स्वरुप असणार आहे. दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सर्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे.
दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रतिमा पुजन, बाईक रॅली, जामखेड क्रिकेट असोसिएशन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन व सायंकाळी भव्यदिव्य मिरवणुकीने समारोप होणार आहे. जामखेड तालुक्याच्या वतीने दि. १२ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणारा जयंती उत्सव सोहळा महाराष्ट्रात आदर्श निर्माण होईल असाच असणार आहे.