शिवजयंती निमित्त शंभूराजे कुस्ती संकुलाचे अध्यक्ष मंगेश(दादा) आजबे व आमदार रोहित पवार मित्रमंडळाच्या वतीने जामखेडमध्ये भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन..
जामखेड प्रतिनिधी,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड यांच्या वतीने जामखेड येथे दि. १९ फेब्रुवारी रोजी भव्य कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शंभूराजे कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष मंगेश (दादा) यांनी दिली आहे.
शंभूराजे कुस्ती संकुलाच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून शिवजयंतीनिमित्त भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात येते. हे सहावे वर्षे आहे. भव्य अशा कुस्ती स्पर्धे महाराष्ट्रातील नामवंत मल्ल हजेरी लावतात. ग्रामीण भागातील कुस्ती हगामा व स्पर्धा लोप पावत असताना जामखेड येथील शंभूराजे कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश दादा आजबे यांनी कुस्ती शौकिनांसाठी व नवीन पैलवान तयार करण्यासाठी मेहनत घेतली असून त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 फेब्रुवारी रोजी जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी जामखेड येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन ते करत असतात या स्पर्धेला कुस्ती शौकिनांचा भरघोस असा पाठिंबा मिळत आहे.
या कुस्ती हंगाम्यात उपमहाराष्ट्र केसरी पै. माऊली कोकाटे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर व महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै हर्षवर्धन सदगीर या दोन प्रथम क्रमांकाच्या कुस्त्यांचा थरार अनुभवता येणार आहे. क्रमांक दोन पै. भैरू माने विरुद्ध पै. सतपाल सोनटक्के तृतीय क्रमांक पै. बापू जरे विरुद्ध पै शिवराज चव्हाण, चतुर्थ क्रमांक पै. चिराग आजबे विरुद्ध शिवरूद्र जगंम तर उद्घाटन कुस्ती पै. माऊली कोरडकर विरुद्ध यश खोटे अशी होणार आहे.
सोमवार दि. १९ रोजी १२ ते ०२ मंगेश कंन्ट्रकशन आँफिस ते श्री नागेश विद्यालयापर्यत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता कुस्त्यांना सुरूवात होणार आहे. या ऐतिहासिक मिरवणूक व भव्य जंगी मैदान पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शंभू राजे कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष मंगेश (दादा) आजबे, शंभू राजे कुस्ती संकुल जामखेड व आमदार रोहित पवार मित्रमंडळ जामखेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या हंगाम्यात कुस्ती निवेदक म्हणून प्रसिद्ध असे पै. धनाजी मदने पंढरपूर व पै दिनेश गवळी बार्शी हे असणार आहेत. कुस्ती मैदान १९ रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत नेमल्या जातील तसेच मैदानात एकही कुस्ती लावली व सोडवली जाणार नाही यामध्ये पंचाचा निर्णय अंतिम राहिल. नावनोंदणी साठी पै बालाजी जरे मो. नंबर 8830793500 पै सुधीर मुळे मो. नंबर 7020681910 यांच्याशी संपर्क साधावा तसेच जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शंभूराजे संकुलाचे अध्यक्ष मंगेश आजबे यांनी केले आहे