सौ.मृणाल इंगळे यांची वनविभागात सर्व्हेयर पदी निवड ..

सौ.मृणाल इंगळे यांची वनविभागात सर्व्हेयर पदी निवड ..

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड यांच्यावतीने सन्मान..

जामखेड प्रतिनिधी,

स्पर्धा परीक्षा करत असताना आपण प्रत्येक आपण अपयशाने खचून जाऊ नये. अभ्यासात सातत्य आवश्यक असते.आपण घेतलेल्या निर्णयाला यशात बदलण्याची ताकद असली पाहिजे. असे सौ मृणाल इंगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

वनविभाग मध्ये सर्व्हेयर झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी  श्री मयूर भोसले सर, श्री लटपटे सर, सौ लटपटे, देशमुख सर, पवार सर, गर्जे सर, मुरकुटे सर , चौधरे सर, शेटे सर इंगळे सर मोरे सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा खाडे यांनी केले.प्रास्ताविक श्री शिंदे बी. एस.सर केले व उपस्थित सर्वांचे आभार ऋतुजा डोंगरे यांनी मानले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page