अहिल्यानगर दक्षिण मधून विजय सुजय विखेंचाच -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नगर । प्रतिनिधी
महाराष्ट्र मजबूत झाला तरच देश मजबूत होईल, मोदींच्या विकासाचे यान चंद्रावर पोहचले आहे. मात्र राहूल गांधीचे यान अद्यापही लॉंच होऊ शकले नाही. महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच होईल, कारण आता जनतेचा विश्वास फक्त मोदी गॅरेंटीवर असल्याचे प्रदिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेत ते बोलत होते.
अहिल्यानगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित केलेल्या जाहीर सभेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. प्रा.राम शिदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी kardile आ. संग्राम जगताप, माजी अरूणकाका जगताप, आ. मोनिका राजळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुशेवठ टायरवाले,भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, शहर अध्यक्ष अभय आगरकर, रिपाईचे भैलुमे यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रिपब्लिक पार्टी आठवले गट तथा मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ततपुर्वी महायुतीच्या वतीने नगर शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीतून डॉ. सुजय विखे पाटील यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केले. प्रभातफेरीपुर्वी डॉ.सुजय विखे पाटील यांनी शहरातील सर्व महापुरूषांना विनम्र अभिवादन केले.या रॅलीमध्ये महिला युवक, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्लीगेट चौकात या रॅलीचा समारोप झाला.
त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना मुख्यंत्री एकनाथ शिदे म्हणाले की , ड्रामा करून कुणी निवडून येत नाही.
विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा आहे. स्व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलरावांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचा वारसा स्व. बाळासाहेब विखे यांची पुढे नेला,तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचा वटवृक्ष केला.आणि सुजय विखे हा वारसा अविरत चालवत आहेत. यामुळे सुजय विखे हे सर्वांच्या सुखादुखात धावून जातात. त्यांना तरूणांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रश्न मोठ्या प्रभावीपणे लोकसभेत मांडले आहेत. यामुळे ज्याच्या नावातच जय आहे त्याचा पराभव अशक्य आहे. डॉ. विखे खासदार झाल्यावर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीप मध्ये सामिल होणार आहेत. यामुळे नगर जिल्ह्याचा विकास जलद गतीने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात इंडी आघाडीचा चांगलाच समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, महायुती सरकार ही विकासाची गाडी असून त्याला वेगवान पंतप्रधान मोदी यांचे इंजिन आहे. तर दुसरीकडे इंडी आघाडीत सर्वच स्वताला इंजिन समजतात. राहूल गांधी, उध्दव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी, असे सर्वच नेते आपल्याला इंजिन समजत असल्याने इंजिनमध्ये केवळ ड्रायवरला बसायला जागा असते. सर्वसामान्यांना इंजिनमध्ये बसता येत नाही. राहूल सोनिया गाधीच्या इंजिन मध्ये राहूल गांधी बसतील होतील, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे बसतील होतील तर उध्दव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे असतील अशी मार्मिक टिका करून दुसरीकडे मोदींच्या विकासाच्या इंजिनला भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आणि इतर मित्र पक्षांचे डबे आहेत. तिथे सर्वांना बसण्यासाठी जागा आहे.
मोदींच्या गॅरंटीमध्ये सबका साथ सबका विकास हे धोरण आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ.सुजय विखे यांचा डबा मोदींच्या गाडीला जोडण्यासाठी १३ मेला मोठ्या मताधिक्याने सुजय विखे यांना मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.तर खा. डॉ, सुजय विखे पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.