सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांच्या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकारी यांची मोहा शाळेला भेट, शालेय कामी तीन शिक्षक गैरहजर

 

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील मोहा गावाचे सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सततच्या तक्रारींनुसार जामखेड पंचायत समितीचे कार्यतत्पर गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी मोहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली .त्यावेळी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले.

 

त्याठिकाणी नियमबाह्य रित्या तीन शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. यामुळे आता गटशिक्षणाधिकारी या शिक्षकांवर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे .
जामखेड तालुक्यातील मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक शालेय कामी वारंवार गैरहजर राहतात. मुलांना शिकवत नाहीत. अशा तक्रारी अनेक तक्रारी मोहा गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या वतीने वारंवार येत होत्या. त्या तक्रारींची दखल घेत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी मोहा शाळेला आज दि .२३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी अचानक भेट दिली असता. पारखे मल्हारी आप्पा, साखरे रजनीकांत रोहिदास, जाधव विजय सुभाष हे शिक्षक शालेय कामी गैरहजर दिसून आले.
यापूर्वीही हेच शिक्षक शालेय कामी गैरहजर दिसून आले होते. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात व कामकाजात बदल झाला नाही. तसेच माहे मार्च २०२४ रोजी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, यांनी या शाळेची वार्षिक तपासणी केली असता. सर्व मुले अप्रगत दिसून आले.

त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अश्या बेजबाबदार शिक्षकांवर कडक कायदेशीर व खात्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी मोहा गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली असून आता गटशिक्षणाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *