जामखेड येथे महावीर जयंती उत्साहात साजरी.
युवकांनी भौतिक शिक्षणासोबतच अध्यात्मिक ज्ञानही आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा.
— राष्ट्रीय संत आचार्य श्री महाश्रमणजी महाराज
जामखेड –
युवकांनी भौतिक शिक्षणासोबतच अध्यात्मिक ज्ञानही आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. ऐकणे किंवा श्रवण करणे महत्त्वाचे असते. यासाठी चांगले ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे काही वेळ साधू संतांच्या सानिध्यात घालवायाला हवा. यामुळे अनेक समस्यांचे समाधान मिळते. जीवनात ध्येय पूर्ण करण्यात मदत मिळते. असे आवाहन राष्ट्रीय संत शांतिदूत योगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांनी केले.
जामखेड येथे महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने महावीरांच्या जयघोषाने शहर दुमदुमुन निघाले. यानिमित्त महावीरांची प्रतिमा सजवलेल्या वाहनातून सवाद्य शोभा मिरवणूक काढण्यात आली.
यानिमित्त शांतिदूत योगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी महाराज यांचे ६४ साधू संतांसह जामखेड मध्ये आगमन झाले.यावेळी महावीर जयंती उत्सव समिती, धर्मोदय युवा मंच, भारतीय जैन संघटना , विहार ग्रुप , गुरु गणेश महिला मंडळ ,आनंद जैन पाठशाला , जय आदिनाथ युवा मंचच्या सदस्यांनी भव्य स्वागत केले. शहरातील कोठारी परिवार आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या निवासस्थानी महामांगलीक देऊन पुढे जैन श्रावक संघाच्या वतीने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत सकल जैन समाज मोठया संख्येने सहभागी झाला.जामखेड महाविद्यालय प्रांगणात महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रीय संत आचार्य श्री महाश्रमणजी महाराज यांचे प्रवचन झाले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी आचार्य श्री महाश्रमणजी म्हणाले, शाकाहार उत्तम आहार आहे.युवकांनी शारीरिक शक्तीचा वापर सैनिकाप्रमाणे करायला हवा रागापासून स्वतःला वाचवा. जेव्हा राग येईल तेव्हा मौन बाळगा. अनेक वेळ युवक त्यांच्यात जेवढी शक्ती असते तेवढा वापर करू शकत नाहीत. त्याचे कारण संकल्पनाचा अभाव आहे. यासाठी जे करायचे ते इच्छाशक्तीने करा. प्रयत्न करावा की युवकांमध्ये अहिंसा, प्रामाणिकपणा ,नैतिकता, साधेपणा आणि व्यसनमुक्तीचे संस्कार राहावेत. युवा वर्गाने व्यसनमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्या शक्तीचा गैरवापर करणे टाळावे. असे आवाहन त्यांनी केले.
शांतिदूत युग प्रधान आचार्य श्री महाश्रमणजी महाराज हे राष्ट्रीय संत असून, भारतीय जैन तेरपंथ समाजाचे आचार्य आहेत. मानवता हाच धर्म आणि व्यसनमुक्ती पासून भारताची सुटका हे प्रमुख उपदेश घेऊन संपूर्ण भारतभर उपदेशपर प्रवचन मार्गदर्शन करीत आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांनी दिली.
जामखेडमध्ये प्रथमच राष्ट्रीय संत आले. हा मोठा सुवर्ण योग मानला गेला. आचार्य श्री महाश्रमणजी महाराज यांचे आयानंतर महाश्रमणजी महाराज यांचे १० ते १२ यादरम्यान धार्मिक प्रवचन जामखेड महाविद्यालयात संपन्न झाले. तर ११ ते ११:३०वाजणेच्या दरम्यान महामंगलपाठ झाले. यासह अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
आचार्य श्रीं महाश्रमणजी महाराजच्या प्रवचनानंतर आ.प्रा राम शिंदे व राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात यांचे भाषणे झाली. यावेळी आचार्य भगवंत महाश्रमजी महाराज यांचे लहान भाऊ श्रीचंद दुगड यांच्यासह प्राचार्य महालिंग डोंगरे, प्रा श्रीकांत होशिंग, सुभाष नहार, डॉ. अनिल नहार, सुभाष समरीया, अभय समदरिया, संजय समदरीया,विजय बंब, अशोक लोढा, गौतम खटोड, प्रवीण मोजकर, महेंद्र मारलेचा, महेंद्र समदरिया,
लेमकरण समदरीया, शांतीलाल समदरीया, जयनेंद्र मरलेचा यांच्यासह कार्यक्रमास मंबई, पुणे, संभाजीनगर, बीड, हैदराबाद, सुरत, राजस्थान येथील जैन बांधवांनी मोठया संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जामखेड जैन श्रावक संघ,आदिनाथ युवा मंच, धर्मोदय एकता मंच ,महिला मंडळाने परीश्रम घेतले होते.