जामखेड प्रतिनिधी
जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी शहरातील सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्याबरोबर कठोर पावले उचलत अपघात व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वाहतुकीचा एक घटक रिक्षा चालकांची बैठक घेऊन त्यांना अनेक सुचना देऊन मार्गदर्शन केले.
आज दि. १० जुलै रोजी रोजी सायंकाळी ७:०० ते ८:०० वाजताचे दरम्यान जामखेड पोलीस स्टेशन येथे रिक्षा चालक यांची मिटिंग घेण्यात आली. या मिटींगसाठी शहरातील ५० ते ६० रिक्षाचालक उपस्थित होते.
या मिटींगमध्ये देण्यात आलेल्या सुचना..
१) रिक्षा चालक यांनी ट्राॅफिकला अडचण येईल अशा कोणत्याही ठिकाणी रिक्षा लावू नये.
२) सर्व रिक्षा चालक यांच्याकडे रजिस्ट्रेशन, परमिट बॅच, ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स, इ कागदपत्रे पाहिजे आहे.
३) सर्व रिक्षा चालक यांना युनिफॉर्म असला पाहिजे.
४) रिक्षा चालकांनी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये.
५) रिक्षा चालकांनी बसस्थानक किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काही अनुचित घटना घडली तर तात्काळ पोलासांना कळवावे.
६) प्रवाश्यांकडून जास्त भाडे आकारू नये.
७)रात्री रिक्षा चालवणारे यांनी पोलीसांसारखे काम करावे.
८)लहान मुले, महिला, मुली यांना सुरक्षित वाटेल असे वागावे
या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून शहरातील ट्रॅफिक व गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.