जामखेड प्रतिनिधी,
जामखेड शहर व पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनने मोठी मोहीम हाती घेतली असून. त्याच अनुषंगाने रात्रीची पेट्रोलिंगही कडक करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात चालणारे अनेक कारनामे उघड होऊन गुन्हेगारांवर जरब बसवण्यात जामखेड पोलीसांना यश येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल दि. ८ जुलै रोजी सांयकाळी६: ०० वा.चे सुमारास जामखेड शहरात गांजा तस्करी करणाऱ्या आरोपी कडून १० किलो गांजा सह १,६०,००० /- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीस अटक करण्यात आली असून दोन अरोपी फरार झाले आहे.
या बाबत जामखेड पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, काल दि ८ जुलै रोजी सांयकाळी ६ : ०० वा.चे सुमारास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटोल यांचे आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस काॅन्स्टेबल प्रविण पालवे, देवा पळसे असे जामखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी एका खाजगी वाहनाने जामखेड शहरात पेट्रोलिंग करत असताना जामखेड नगर रोडवरील कावेरी हॉटेल समोर आष्टीकडून जामखेड कडे
एक लाल रंगाची मोटार सायकल तिचे पेट्रोलटाकीवर एक काळया रंगाची बॅग ट्रिपल सिट असलेले मुले समोरून येताना दिसताच पोलीसांना त्यांचा संशय आल्याने त्यांना थांबण्याचा इशारा केला असता सदर गाडीवरील पाठीमागे बसलेले दोन इसम पोलीसांना पाहून पळून गेले व गाडीवर बसलेल्या आरोपी नाव संजय राजेंद्र पवार वय २३ वर्षे रा.जुने बसस्टँडचे पाठीमागे, जामखेड व होन्डा कंपनीची स्टनर मोटार सायकल एम एच ०८ एस ७६४१ लाल रंगाची हि मिळून आल्याने सदर मोटार सायकलबाबत विचारपूस केली असता ती माझीच आहे असे सांगितल्याने त्यास सदर बँग बाबत विचारपूस केली असता
त्याने उडवा उडवीचे उत्तर दिल्याने सपोनि बड़े सो यांनी बॅगची चैन खोलून पाहीले असता बॅगमध्ये विक्रीस प्रतिबंध असलेला उग्र वासाचा गांजा मिळून आल्याने सपोनि बड़े सो यांनी लगेच सदर बाबत मा.पो नि श्री महेश पाटील सो, मा. तहसिलदार श्री योगेशकुमार चंद्रे सो जामखेड,. मुख्याधिकारी साळवे सी, वजनकाटा धारक किराणा दुकानदार यास सदरचायत माहीती देवून कारवाई करणेकामी हॉटेल कावेरी समोर बोलावून घेतले.
सदर आरोपी नामे संजय राजेंद्र पवार वय २३ वर्षे रा.जुने बसस्टैंडचे पाठीमागे, जामखेड ता. जामखेड याचेकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की, सदरचा गांजा हा बबलू शंकर काळे रा.मिलींदनगर जामखेड (फरार) याचा असून तो माल बबलू काळे याने बाळू कांतीलाल काळे रा.खडकवाडी, जामखेड
(फरार) यास सोबत घेवून सदरचा माल कोणाला देणार होता हे माहीत नाही असे सांगितल्याने सदर घटनेचा सपोनि बड़े सो यांनी जागीच लाईटचे लख प्रकाशात आरोपी याचेकडे मिळून आलेला २ किलो वजनाचे ५ पुडे त्यास चिकटटेपने गुडाळलेले असा एकूण १० किलो गांजा मा. तहसिलदार सो व दोन शासकीय पंचासमोर यांचे समक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. मिळून आलेला गांजा व मोटार सायकल असा एकुण १,६०,००० /- रूपये किमतीचा मुददेमाल ताब्यात घेवून जामखेड पोस्टेला पुढील कारवाई करत असून पळून गेलेल्या आरोपीचा शोध जामखेड पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे सुनिल बड़े, पोलीस हेडकॉन्टेबल संजय लाटे, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस काॅन्स्टेबल देवा पळसे, प्रविण पालवे, सचिन पिरगळ, गणेश भागडे, घोळवे,देवढे , सुपेकर, पाचपुते यांनी सहकार्य केले.