धोंडपारगावची ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात धोंडपारगावच्या सरपंच पदी सौ.अर्चना बळीराम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव ग्रामपंचायतची निवडणूक 2021 साली झाली होती यामध्ये 7 सदस्य निवडून आले व सरपंच पद हे अडीच अडीच वर्ष फार्मुला नुसार ठरले व पाहिल्यान्दा मनीषा औदुंबर शिंदे यांना संधी देण्यात आली व उपसरपंच दत्तात्रय भीमराव शिंदे यांना बिनविरोध करण्यात आलं
आता या प्रक्रियेला होऊन अडीच वर्ष पूर्ण झाल्याने भाजपच्या सरपंच मनीषा औदुंबर शिंदे यांनी राजीनामा दिल्याने आता सरपंच पदी सौ.अर्चना बळीराम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रा राम शिंदे यांचे समर्थक अर्चना बळीराम शिंदे यांची सरपंच पदी वर्णी लागल्याने निश्चित विकास होईल अशी चर्चा गावामध्ये आहे.त्यात प्रा राम शिंदे विधानपरिषदेचे आमदार आहेत त्यात राज्यात सतेत भाजप असल्याने निधी नक्कीच आणण्यात सरपंच शिंदे या यशस्वी होतील
यावेळी अर्चना शिंदे म्हणाल्या मी सर्व सदस्यांना बरोबर घेऊन गावचा विकास करिन व प्रा आमदार राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी अन्नन्याचा प्रयत्न करिन
यावेळी पिंपरखेडचे सरपंच बापुराव ढवळे, भाजपचे नेते पांडुरंग उबाळे, युवा नेते अमोल शेट शिंदे,पै दत्ता भाऊ शिंदे, मार्केट यार्ड चे संचालक गजानन शिंदे रत्नापुर चे सरपंच दादासाहेब वारे, हनुमंत शिंदे, सुखदेव शिंदे, बळीराम शिंदे, अमोल शिंदे, कैलास शिंदे,रवि शिंदे, दादा साळवे, किरण शिंदे, सुनील धुमाळ,संपत शिंदे, मुकुंद शिंदे,व धोंडपारगाव ग्रामपंचायत चे सदस्य कैलास मगन शिंदे, अमोल बाळू शिंदे, अलका दादाहरी साळवे, मंदा प्रदीप शिंदे उपस्थित होते.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून रवींद्र जोशी मंडळाधिकारी पाटोदा यांनी काम पहिले.