जामखेड प्रतिनिधी
*कर्जत-जामखेड :* अगामी 2024 च्या विधानसभा निवडणूकीची जय्यत तयारी भारतीय जनता पार्टीने हाती घेतली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा आज केली आहे. माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांची कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या निवडणुक प्रमुखपदी पक्षाने निवड केली आहे.
अगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपची पुन्हा सत्ता यावी यासाठी भाजपने जोरदार तयारी हाती घेतली आहे. पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी भाजपने राज्यातील 288 अनुभवी नेत्यांवर विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. तशी घोषणा आज पक्षाकडून करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुक प्रचार प्रमुखांची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने आमदार राम शिंदे यांची 227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंघ निहाय निवडणूक प्रचार प्रमुख खालील प्रमाणे
216 – अकोले मतदारसंघ (ST) : वैभव पिचड
217 – संगमनेर मतदारसंघ – सतिश कानवडे
218 – शिर्डी मतदारसंघ – ॲड रघुनाथ बोठे
219- कोपरगाव मतदारसंघ – स्नेहलता कोल्हे
220 – श्रीरामपूर मतदारसंघ (SC) – नितीन दिनकर
221 – नेवासा मतदारसंघ- बाळासाहेब मुरकुटे
222 – शेवगाव मतदारसंघ- नारायण भगवान पालवे
223 – राहुरी मतदारसंघ – शिवाजीराव कर्डिले
224 – पारनेर मतदारसंघ – विश्वनाथ कोरडे
225 – अहमदनगर – भैय्या गंधे
226 – श्रीगोंदा – बाळासाहेब महाडिक
227 – कर्जत-जामखेड मतदारसंघ – आमदार प्रा.राम शिंदे