स्वतः फुलवलेल्या फळबागेतच घेतला अंतिम श्वास..!
जामखेड प्रतिनिधी,
आज बुधवार दि. ०८ रोजी सकाळी ७.०० वाजता नगर येथील एका खासगी रुग्णालयातून सौ.शहाबाई सानप यांना ‘डिस्चार्ज’ मिळाला होता. मात्र घरी पोहोचताच त्यांनी बुधवार ता .०८ रोजी सकाळी ११:३५ ला श्वसनाचा पुन्हा त्रास झाला आणि त्यातच त्यांनी अंतिम श्वास घेतला.
सौ शहाबाई सानप या जठर आणि फुफ्फुस संसर्ग आजाराने मागील दोन वर्षांपासून त्रस्थ होत्या ; त्यांना पुणे व नगर येथील नामांकित रुग्णालयात उपचार घेतले मात्र या आजाराच्या जोखडातून त्या बाहेर पडू शकल्या नाहीत. अखेर त्यांची प्राणज्योत रुग्णालयातून घरी पोहोचताच मालवली ; त्यांच्या पार्थिवावर तरडगाव येथील त्यांच्या शेतातील ‘आमराई’ येथे दुपारी ३.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
फुलवलेल्या फळबागेतच घेतला अंतिम श्वास..!
—————————————
सौ.शहाबाई सानप यांनी पती विष्णूपंत सानप यांच्या सेवावृत्ती नंतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंबा,लिंबू,संत्रा,नारळ, चिकू , जांभूळ या आडीच हजार झाडांची लागवड केली होती. त्यांना वीस वर्षांपासून श्वसनाचा आजार (दमा ) होता मात्र निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यामुळे त्यांनी वयाची सत्तरी गाठली ; हे मात्र निश्चित. दरम्यान मागील दोन वर्षांपासून पोटदुखी च्या त्रासाने ‘अंग ‘ वर काढले आणि अंतिम टप्यात हृदयाचे ठोके ही मोठ्या प्रमाणात वाढले त्यामुळे त्यांनी वैद्यकीय उपचारानंतर ही घरी परताच अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पती सेवावृत्त शिक्षक विष्णूपंत सानप, मुलगा पत्रकार वसंत सानप, सून माजी सरपंच भाग्यश्री सानप, पुतण्या डॉ.विवेक सानप, इंजिनिअर सत्यवान सानप, ज्ञानेश्वर सानप, जावई विक्रीकर आयुक्त अशोकराव नागरगोजे, सुरक्षा अधिकारी शंकर खाडे, मुलगी सुरेखा नागरगोजे, राणी खाडे, डॉ.सायली सानप , नेहा सानप, अमृता सानप, नातू डॉ.अविनाश नागरगोजे, डॉ.अभिषेक नागरगोजे , पृथ्वीराज सानप, पार्थ खाडे, श्लोक खाडे, आदित्य सानप, चिंतामणी सानप, बंबू सानप, श्रावणी सानप , दीदी सानप असा परिवार आहे.
——————————————-
पन्नास वर्षांचा संसार थांबला..!
——————————————-
सौ.सानप या या परिसरात ५० वर्षांपूर्वी सून म्हणून आल्या तेव्हा कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट होती ; मोठ्या हिमतीने त्यांनी पती विष्णूपंत सानप यांना साथ दिली आणि कुटुंब उभा केले. मात्र वृध्दापकाळाच्या उंबरठ्यावर त्यांना वीस वर्षांपासून बरोबर असलेल्या श्वसनाच्या आजाराने पाठ सोडली नाही ; अखेर त्यातच त्यांनी अंतिम श्वास घेतला.
—————————————–
माहेरकडचा परिवारही मोठा
——————————————
महासांगवी ता.पाटोदा येथील रहिवासी तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती महेंद्र गर्जे यांच्या त्या भगिणी होत . तसेच त्यांना नऊ भाऊ, चार बहिणी, दोन चुलते , वीस भाचे, सात भाचा, नातवंडे असा परिवार आहे.