सोनेगाव सरपंच पदाची निवड उद्या होणार..

सोनेगाव सरपंच पदाची निवड उद्या होणार..

 

जामखेड प्रतिनिधी,

गायवळ बंधूंच्या आशीर्वादाने,

डॉ.विशाल वायकर यांची वर्णी लागण्याची शक्यता?

याबाबत माहिती अशी की जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या व विकास कामांच्या माध्यमातून प्रगतीपथावर असणारी सोनेगाव ग्रामपंचायत ही महत्त्वाची मानली जाते. गेली अनेक वर्षांपूर्वी सोनेगाव या ठिकाणी राजकारणातून मोठा संघर्ष होऊन सततच्या गटबाजीमुळे धुमसत होते.

त्यानंतर सोनेगाव ग्रामपंचायत ही सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ व प्रा. सचिन सर गायवळ यांनी गेली दहा वर्षापासून बिनविरोध करून ग्रामपंचायत वर पकड निर्माण केली आहे. त्यामुळे सतत गावात होणारा राजकीय संघर्ष बऱ्याच प्रमाणात कमी केला आहे. तसेच सोनेगाव मध्ये गायवळ बंधूंच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत व काही कामे प्रगतीपथावर आहेत.
यापूर्वी झालेली ग्रामपंचायत निवडणुकीत ही बिनविरोध केल्यानंतर सरपंच पदी सौ. रुपाली पद्माकर बिरंगळ यांची निवड करण्यात आली होती. सौ. बिरंगळ यांनीही महिला सरपंच असूनही चांगली कामे केली होती. परंतु संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून आंतरवली सराटी जिल्हा जालना या ठिकाणी उपोषण सुरू केले होते.

त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा मिळत असताना सोनेगावच्या सरपंच सौ. रुपाली बिरंगळ यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरपंच पदाचा त्याग करून जामखेड येथील मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेत पाठिंबा देऊन सरपंच पदाचा राजीनामा प्रशासनाकडे सुपूर्द केला होता.त्यामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली होती,या राजीनाम्यामुळे रूपाली बिरंगळ या जामखेड तालुक्यात चर्चेत आल्या होत्या.
त्यानंतर नवीन सरपंच पदाची निवड ही दिनांक 9 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे माहिती प्रशासनाने दिली आहे. याबाबत पुढील सरपंच कोण होणार याबाबत मोठे तर्क वितर्क ला उधान आले आहे.
सोनेगावच्या सरपंच पदासाठी निलेश भाऊ गायवळ व सचिन सर गायवळ हे दोन बंधू चर्चा करून अडीच वर्षासाठी सरपंच पदाचा उमेदवार ठरणार आहेत.
याबाबत राजकीय कानोसा घेतला असता डॉ. विशाल राजेंद्र वायकर यांच्या नावावर दोघा गायवळ बंधूचे एकमत होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय गोटातून व्यक्त केली जात आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page