मतेवाडीमध्ये सत्तांतर
ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेडा :
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील
मतेवाडी ग्रामपंचायतमध्ये गेल्या ३० वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावत सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तीला मतेवाडी ग्रामस्थांनी गावचा कारभार हातात दिला आहे 30 वर्षात गावचा न झालेला विकास पाहता ग्रामस्थांनी तीस वर्षाची सत्ता उलथून लावली आहे.
श्री-नाथ कृपा ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सरपंचपदासाठी तात्या राजेंद्र कसरे विजयी झाले तर सदस्यपदासाठी सुनिता रघूनाथ मते ,शिल्पा रोहिदास कसरे ,सत्यवान गोरख आव्हाड ,अरूण केरु कसरे यांचा दणदणीत विजय झाला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भाऊसाहेब कसरे म्हणाले की जे वचन निवडणुकीत ग्रामस्थांना दिले आहे त्यासाठी विरोधकांसह सर्व ग्रामस्थासाठी काम करण्यास आहोरात्र कटिबद्ध आहे.जाहीरनाम्यात जे मुद्धे मांडले होते ते तर आम्ही पूर्ण करूच परंतु ज्या गोष्टी ची गरज गावासाठी असेल ती पूर्ण करू आणि गावचा रस्ता, पिण्याचे पाणी, गटारीचे कामे, कचरायची विल्हेवाट यावर आम्ही काम करू.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच तात्या राजेंद्र कसरे म्हणाले की ग्रामस्थांच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गोरगरीब माणसांचे सर्व काम प्रामाणिकपणे करीन.आणि सर्व विरोधकांना देखील आम्ही बरोबर घेऊन जनतेची कामे निःस्वार्थ पणे करू.
मतेवाडी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.सर्व सामान्य माणूस सरपंच झाल्याचा आनंद ग्रामस्थांनी जल्लोषात फटाके फोडून व गुलाल उधळून साजरा केला .
यावेळी यूवा नेते भाऊसाहेब कसरे, नारायण पागीरे, संतोष पागीरे, अंकुश पागीरे, बबन पागीरे, सोमनाथ उर्फ पींटु पागीरे, आशोक मते, हूसेन शेख, आण्णा मते ,दत्तात्रय पागीरे, बजरंग डूचे ,मारूती पागीरे यांच्यासह सर्व मतेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.