मोहा ग्रामस्थांचे विज ट्रान्सफार्मरसाठी महावितरण ऑफिस समोर उपोषण

जामखेड प्रतिनिधी

मोहा गावातील झेंडे वस्ती व गायकवाड वस्ती येथे विजेची सिंगल फेज ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी मोहा ग्रामस्थ दि ६ नोव्हेंबर रोजी दूसरयांदा उपोषणास बसले आहेत .
मोहा ग्रामपंचायत अंतर्गत झेंडे व गायकवाड वस्ती येथे गेल्या पंधरा वर्षांपासून लाईट नाही .

गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत महावितरणकडून लेखी अर्ज दिला .तोंडी पाठपुरावा केला अंदोलन उपोषण करण्याचा इशारा दिला मात्र संबधित आधिकारयांनी कसलीही दखल घेतली नाही .विजेअभावी होणारा त्रास सहन करावा लागत आहे
संबधित विभागला ग्रामस्थांच्या त्रासाची जाणीव करून देण्यासाठी व जाग आणण्यासाठी सरपंच भिमराव कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे .

या उपोषणाला माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर,सरपंच भिमराव कापसे, माजी सरपंच शिवाजी डोंगरे ,ग्रामपंचायत सदस्य पंडित गायकवाड, वसंत झेंडे, विनोद इंगळे, विकास सांगळे,वामन डोंगरे ,प्रमोद रेडे ,पांडुरंग देडे, तसेच रिपब्लिकन सेनेचे बाळासाहेब गायकवाड, दत्ता, नंदकुमार गायकवाड ,आकाश जोगदंड, लिलाबाई गायकवाड ,संजय गायकवाड ,मंदाबाई गायकवाड, काजल गायकवाड, छाया गायकवाड ,अनिता गायकवाड ,रमेश नवगिरे पोपट गायकवाड, आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *