*जवळकेकरांना आमदार प्रा.राम शिंदे यांचे मोठे गिफ्ट*

*सटवाईदेवी मंदिर परिसराच्या विकासासाठी 2 कोटी 96 लाख रूपयांचा निधी मंजुर*

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सटवाई देवी मंदिराच्या विकासासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. पर्यटन व सांस्कृतिक विभागाने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून जवळके गावासाठी तब्बल 2 कोटी 96 लाख रूपयांचा भरघोस निधी मंजुर केला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी जवळकेकरांना मोठे गिफ्ट भेट दिल्याने जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जामखेड तालुक्यातील जवळके येथे सटवाई देवीचे मंदिर आहे. जामखेड सह राज्यातील हजारो भाविकांचे हे श्रध्दास्थान आहे. सटवाई देवी मंदिर परिसराचा पर्यटन विभागाकडून कायापालट व्हावा यासाठी जवळके ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते.जामखेड तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास करून पर्यटनात वाढ व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या आमदार प्रा.राम शिंदे यांनी जवळके येथील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता महायुती सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला होता.

जवळके येथील सटवाई देवी मंदिर परिसराचा कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार शिंदे यांनी परिपूर्ण आराखडा सरकारकडे सादर केला होता. महायुती सरकारने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत जवळके येथील सटवाई देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2023-24 अंतर्गत तब्बल 2 कोटी 96 लाख रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील जवळके (सटवाई) येथील प्रसिद्ध सटवाई देवी मंदिर परिसराचा कायापालट व्हावा यासाठी पर्यटन विभागाने 2 कोटी 96 लाख रूपयांच्या कामांस प्रशासकीय मान्यता दिली असून तात्काळ 88 लाख रूपयांचा निधी मंजुर केला आहे. जवळके येथील सटवाई देवी मंदिर परिसरात भक्तनिवास, सभामंडप, पेव्हिंग ब्लॉक, पाण्याची टाकी, संरक्षक भिंत, शौचालय, रस्ते आदी कामे केली जाणार आहेत. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून राज्य सरकारने जवळके गावासाठी भरिव निधी मंजूर केल्याबद्दल जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जवळके येथे प्रसिद्ध सटवाई देवीचे मंदिर आहे. राज्यातील हजारो भाविकांचे हे श्रध्दास्थान आहे. या मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुढाकार घेत सुमारे 3 कोटी रूपयांचा निधी मंजुर करून आणला आहे. आमदार शिंदे यांच्या दूरदृष्टीतून सटवाई देवी मंदिर परिसर आता राज्याच्या पर्यटन नकाशावर झळकताना दिसणार आहे. सटवाई देवी परिसराच्या विकासासाठी आमदार राम शिंदे व महायुती सरकारने भरघोस निधी मंजुर केल्याबद्दल जवळके ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

चौकट

जामखेड तालुक्यातील जवळके येथील सटवाईदेवी मंदिर परिसर पर्यटनाच्या नकाशावर यावा अशी ग्रामस्थ व देवी भक्तांची मागणी होती. त्यानुसार सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला होता. पर्यटन व सांस्कृतिक विभागाने 2 कोटी 96 लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीतून सटवाईदेवी मंदिर परिसरात विविध विकास कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे भक्तांची गैरसोय दुर होईल. पर्यटन वाढण्यास मदत होईल. महायुती सरकारने सटवाईदेवी मंदिर परिसराच्या विकासासाठी भरिव निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच महायुती सरकारचे मनापासून आभार.

*- आमदार प्रा.राम शिंदे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *