*ल.ना.होशिंग विद्यालय येथे शिक्षण परिषद संपन्न..*
जामखेड चे शैक्षणिक काम राज्याला दिशादर्शक ठरेल :- दिलीप गुगळे…
जामखेड :- जामखेड तालुक्यात सर्व शिक्षक झपाटून कामाला लागले असून वेगवेगळे उपक्रम राबवून शाळेचे गुणवत्ता वाढवत आहेत त्यामुळे जामखेड तालुक्यात कधी नव्हे एवढे चांगले शैक्षणिक वातावरण झाले असून जामखेड तालुक्यात शैक्षणिक कामकाज चांगले असल्यामुळे ते राज्याला दिशादर्शक ठरेल असे गौरवोद्गार जामखेड शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे यांनी आयोजित शिक्षण परिषदेत आपले मत व्यक्त केले.
आज रोजी जामखेड शहरातील ल.ना.होशिंग विद्यालय येथे शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये पाच केंद्रातील शिक्षक तसेच पहिली ते आठवी पाठ्यपुस्तकातील वेगवेगळे बदल झालेल्या अभ्यासक्रमाबाबत ट्रेनिंग मधून माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी उपस्थित विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख शिक्षक शिक्षिका त्यांना माहिती दिली.
पुढे बोलताना गुगळे म्हणाले जामखेड तालुका शैक्षणिक कार्यासाठी शाळांना व शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य करू.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक बदलाची सुरुवात स्वतः पासून केली पाहिजे.तालुक्यातील शिक्षक वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत आहेत.ही अभिमानाची बाब आहे.
याप्रसंगी जामखेड शहरातील प्रसिद्ध उद्योगपती दिलीप शेठ गुगळे यांची जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी निवड व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती सुलभा पूंडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे होते
तर विस्तार अधिकारी सुरेश मोहिते, केंद्रप्रमुख नवनाथ बडे, केंद्रप्रमुख विक्रम बडे, शिक्षक बँकेचे संचालक संतोष कुमार राऊत,केंद्रप्रमुख मल्हारी पारखे,ल.ना.होशिंग विद्यालय चे प्राचार्य श्रीकांत होशिंग, उप मुख्याध्यापक बाळासाहेब पारखे, पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड आदी तालुक्यातील शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.