*जर शेतकऱ्यांचे पंचनामे व्यवस्थित केले नाहीत तर काही दिवसात संबंधित पंचनामे करणार्‍या अधिकार्‍यांना काळे फासनार – मंगेश (दादा)आजबे*

*जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा व वाघा शेतकऱ्यांनाचा तहसीलवर मोर्चा…*

जामखेड प्रतिनिधी,

पिंपळगाव उंडा व वाघा सह जामखेड तालुक्यातील सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पीक, ज्वारी कांदा व तुर यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र शासनाने जाहीर केलेल्या नुकसान अनुदान देणे कामी पंचनाम्यासाठी पाठवलेले अधिकारी योग्य त्या पद्धतीने पंचनामे करत नसुन टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी धडक मोर्चा काढुन संताप व्यक्त केला. जर पंचनामे व्यवस्थित केले नाहीत तर काही दिवसात संबंधित पंचनामे करणार्‍या अधिकार्‍यांना काळे फासण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश (दादा) आजबे यांनी दिला आहे.

पिंपळगाव उंडा वाघा गावासह जामखेड तालुक्यातील सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पीक, ज्वारी कांदा व तुर यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र संबंधित पंचनामे करणारे अधिकारी पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. याच अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश दादा आजबे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांन समवेत जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले.

दि २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ रोजी पिप झालेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या सर्व शेतक-यांचे पीक (ज्वारी लांब तुर इ) पूर्णपणे भुईसपाट झालेले असुन आमव्या हाता मध्ये रुपयाचे पीक लागणार नाही आम्ही सर्व शेतकरी शेतीवर अवलंबुन असुन आमचे झालेले नुकसान काही असुन न नी वारे आहे. शासनाने जाहीर गेलेल्या नुकसान अनुदान देणे कामी शासनाने पंचनाम्यासाठी पाठविलेले अधिकारी योग्य त्या पतीने
पंचनामा करीत नाही मनमानी कारभार करतात नुकसान झालेले क्षेत्र व्यवस्थित लिहीत नाही त्यामुळे आमचे कुंटुबाची उपासमार होण्याची शक्यता आहे

व आम्ही शासनाने जाहीर केलेल्या-अनुदानापासून वचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे पंचनामा करणारे अधीकारी यांना आपण योग्य तो आदेश दयावा व आमलच्यावर अन्याय होणार नाही यासाठी पाठपुरावा करावा हि विनंती निवेदन देऊन केली आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश दादा आजबे, गणेश मुरलीधर ढगे, सतीश ढगे, आश्रू शिंदे, मोहन ढगे, सदाशिव ढगे, अरुण ढगे, हनुमंत ढगे, बाबासाहेब ढगे, भाऊसाहेब जाधव, नारायण गव्हाणे, शिवाजी पवार, विजय कुलकर्णी, तात्याराम ढगे, अमोल ढगे, लक्ष्मण जगताप, साखरबाई गव्हाणे, बळीराम ढगे, सुभाष बजगुडे, काशीबाई बजगुडे, नवनाथ गव्हाणे, विश्वनाथ जगताप, बाप्पू पवार, उमेश ढगे, मन्सूर शेख, रमजान शेख, सिद्धार्थ साळवे, सिद्धेश्वर सुतार, मुरलीधर मोहळकर, मित्रजित भालेराव, विठ्ठल जगताप, बालाजी जगताप इत्यादी पिंपळगाव उंडा व वाघा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *