*सिंचन विहिरी व फळबाग योजनेचे अर्ज ऑनलाईन करावे- गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे आवाहन.*

जामखेड प्रतिनिधी,

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून सिंचन विहीर आणि फळबाग योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. सिंचन विहिरीसाठी चार लाख रु तर फळबाग साठी दीड ते दोन लाख रु अनुदान दिले जाते. यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून हे लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्सुक असतात. यापूर्वी शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत असे.

यामध्ये वेळेचा अपव्यय होत असे. तसेच आपला अर्ज कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे याची माहिती लाभार्थ्यांना मिळत नसे. त्यामुळे शासनाने सिंचन विहीर व फळबाग योजनेचे अर्ज करण्यासाठी Maha EGS Horticulture हे app तयार केले आहे. या app च्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घेता येणार आहे.

App ची वैशिष्ट्ये-
१. ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून अर्ज करता येणार.
२. कमी वेळात अर्ज।पंचायत समितीला दाखल होणार
३. अर्ज आधी ग्रामपंचायत लॉगिनला व त्यानंतर पंचायत समिती लॉगिनला येणार
४. ऑनलाईन अर्जावर तात्काळ कार्यवाही केली जाणार
५. अर्जाची सद्यस्थिती लाभार्थ्यांला समजणार

*-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती जामखेड.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *