राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मंगेश दादा आजबे मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
*जिजाऊमाता यांच्याकडून मिळालेल्या
मार्गदर्शन आणि शिक्षणामुळे छत्रपती शिवाजी
महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं-पोलीस निरीक्षक महेश पाटील*
जामखेड प्रतिनिधी,
12 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सुरभी ब्लड सेंटर अहमदनगर च्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेऊन संपन्न झाली यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास सुरवात कारण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, आयोजक मंगेश दादा आजबे, सोमनाथ भाऊ राळेभात,नगरसेवक बीबीषण धनवडे, सुंदरदास बिरंगळ,मनोज कुलकर्णी,मनोज भोरे, शरद शिंदे,हजारे डॉक्टर, राहुल पवार, कृष्णाराजे चव्हाण,सलीम तांबोळी, हर्षद मुळे, दादाराजे भोसले,सरपंच दत्ता साळुंके, सचिन साळुंके,हर्षल डोके,बाळासाहेब ठाकरे, कृष्णा डुचे, ऋषिकेश डुचे, गणेश खेत्रे, बालाजी जरे,गहिनीनाथ इंगळे, ठाकरे महाराज व शंभूराजे कुस्ती संकुलतील सर्व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ माता अगदी स्वतंत्र विचाराच्या होत्या.
त्यांना आपल्या देशाबद्दल आणि धर्माबद्दल
नेहमीच प्रेम वाटायचं. म्हणूनच त्यांच्या पोटी
जन्माला आलेल्या वीर छत्रपती शिवाजी
महाराजांना देखील त्यांनी लहानपणापासूनच
देशप्रेम, धर्मप्रेम, एकनिष्ठचे धडे दिले.
जिजाऊमाता यांच्याकडून मिळालेल्या
मार्गदर्शन आणि शिक्षणामुळे छत्रपती शिवाजी
महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं.
मराठा साम्राज्य स्थापन करण्यामध्ये
जिजाबाई यांचं फार मोठं श्रेय आहे. त्यांच्याच
मार्गदर्शनाखाली महाराजांनी त्यांचं प्रत्येक
पाऊल उचललं. जिजाबाई यांची वीर माता
अशी ओळख आहे. त्या फक्त एक स्त्री
नव्हत्या तर त्या एक शूर आई एक धाडसी
पत्नी आणि एक योद्धा देखील होत्या.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक म्हणाले,राजमाता जिजाऊ यांची नुसती जयंतीच साजरी नाही करता आपण त्यांचे विचार आत्मसात करावेत व त्यांचे विचार आचरण समाजामध्ये पोहचवण्याचे काम आपण केले पाहिजे राजमाता जिजाऊ या एक शूर पराक्रमी योध्या व आई होत्या ज्यांनी या देशाला पंथाला शूर पराक्रमी योद्धा दिला छत्रपती शिवाजी महाराज त्यांची आज जयंती आपण सर्व जण मोठ्या उत्साहात साजरी करतो आहोत तेव्हा आपण त्यांच्या विचार घेऊन पुढे जाऊयात असे मत व्यक्त करत भव्य रक्तदान शिबिराला शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंगेश दादा आजबे आभार व्यक्त करताना म्हणाले,राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्याचं हे 9 वे वर्ष आहे आम्ही दर वर्षी जयंती निमित्त रक्तदान शिबीर घेत आहोत, राजमाता जिजाऊ यांचे कार्य खूप मोठे आहे त्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या देठाला हात लावण्याची देखील कोणाची हिम्मत होत नव्हती, शेतकरी कष्टकरी यांच्यावरील प्रेम, शूरता आणि एक आई म्हणू घडवलेले छत्रपती शिवाजी महाराज धर्म, पंथ, प्रजा पती असणारे प्रेम आणि शूर वीर योद्धा या देशाला दिला त्यांचेच विचार घेऊन आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न करूयात आणि आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो
यावेळी या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले