आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रश्नांवर विधानपरिषदेत आवाज उठवणार – आमदार प्रा.राम शिंदे
जामखेड प्रतिनिधी,
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसंदर्भात येत्या अधिवेशनात आवाज उठवून राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द आमदार प्रा.राम शिंदे यांनी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाशी चोंडी येथील निवासस्थानी बोलताना दिला.
आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी यापुर्वी संप पुकारला होता, यावेळी शिष्टमंडळाशी वाटाघाटी करताना आरोग्य मंत्री यांनी 1 नोव्हेंबर 2023 रोजी विविध मागण्या मान्य केल्या होता. यामध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक दिवाळी भेट 2 हजार रूपये दिवाळीपुर्वी देण्यात येणार, आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात 7 हजार रूपयांनी वाढ करणार, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 10 हजारांची वाढ करण्यात येणार अश्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी न झाल्याने आज 12 जानेवारी 2024 पासून राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे.
त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या जामखेड तालुक्यातील शिष्टमंडळाने आज 12 जानेवारी 2024 रोजी आमदार प्रा.राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत या शिष्टमंडळाने विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. सरकार दरबारी आमच्या मागण्या मांडून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही विनंती केली. यावेळी जामखेड तालुक्यातील शिष्टमंडळाने आमदार प्रा.राम शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन सोपवले. यावेळी तालुक्यातील सर्व आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रा.राम शिंदे यांनी आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या विविध मागण्यांवर न्याय तोडगा निघावा यासाठी येत्या अधिवेशनात विधानपरिषदेत आवाज उठवणार असल्याचा शब्द त्यांनी शिष्टमंडळाला दिला. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला.
यावेळी शिरोळे एस एस, शिंदे एन बी, साळवे एस ए, मोरे एस ए , शिंगाणे एम पी, वाघमारे, रेखा कापसे, अंकुश एस ए, गोपाळघरे ए. बी, नाईक जी के, साठे एल एन, जयश्री बाबुशा जाधव, आशा टेपाळे, शबाना बागवान, सविता जाधव, स्वाती हुलगुंडे, मनिषा शिलवंत, जया साळूंके, मैना हुलगुंडे, शाहिस्ता सय्यद, सादिका शेख, माधुरी बेलदार, मनिषा बिरंगळ, कल्पना चिंतामणी सह आदी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.