जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत गायकवाड, उपाध्यक्षपदी डॉ. सिताराम ससाणे तर सचिवपदी डॉ. सादेख पठाण यांची बिनविरोध निवड
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्सना येणाऱ्या विविध अडचणी व तालुक्यातील विविध समाज घटकातील नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी तालुक्यातील काही सामाजिक दृष्टिकोन असणाऱ्या काही डॉक्टर्स मंडळींनी एकत्र येत जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन या संघटनेची नुकतीच संघटनेची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करण्यात आली आहे.
या संघटनेची प्रथम कार्यकारणी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार अध्यक्षपदी डॉ. प्रशांत गायकवाड, उपाध्यक्षपदी डॉ. सिताराम ससाणे तर सचिवपदी डॉ. सादेख पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील डॉक्टरांना आपला व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
यावेळी निवड करण्यात आलेली कार्यकारणी : अध्यक्ष डॉ. प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. सिताराम ससाणे सचिव डॉ. सादेख पठाण, उपाध्यक्ष ( महिला) डॉ. विशाखा देवकर, कोषाध्यक्ष डॉ. चंद्रकिरण भोसले, कार्यकारी सदस्य डॉ. सुशिल पन्हाळकर, कार्यकारी सदस्य डॉ. विकी दळवी या सर्वांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.