जामखेड तालुक्यात 132 शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक सिंचन विहिरीचे एकूण 5 कोटी 28 लाख रुपयांच्या निधीचे वाटप

सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनेगाव, तरडगाव, वंजारवाडी, दौंडवाडी व पोतेवाडी ग्रामपंचायतने 132 शेतकऱ्यांना 5 कोटी 28 लाख रुपयांच्या विहिरीचे वाटप…

जामखेड प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनेगावचे सरपंच डॉक्टर विशाल वायकर 51 विहिरी, तरडगाव दौंडवाडी वंजारवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच डॉ. जयराम खोत यांनी 51 विहिरी तसेच पोतेवाडी सरपंच प्रवीण पोते यांनी 30 विहिरी अशा प्रकारे एकूण 132 शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक सिंचन विहिरीचे एकूण पाच कोटी 28 लाख रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे सचिन सरांचा वाढदिवस हा खऱ्या अर्थाने वेगळा सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला आहे. त्यामुळे आगळावेगळा आनंद शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यात दरवर्षी 28 जानेवारी रोजी प्राध्यापक सचिन सर गायवळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो यामध्ये विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,हॉस्पिटलमध्ये फळे वाटप, तसेच आरोग्य शिबिर त्याचबरोबर अनेक ठिकाणी डिजिटल बोर्डद्वारे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कार्यकर्ते व्यक्त करीत असतात.

यावर्षी सोनेगावचे सरपंच डॉ. विशाल वायकर तडगाव, दौंडवाडी, वंजारवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच डॉ. जयराम खोत व पोतेवाडीचे सरपंच प्रवीण पोते यांनी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सचिन सर गायवळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपापल्या गावांमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहिरीचे अनुदान मिळविण्यासाठी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता पंचायत समिती जामखेड येथे करून 132 शेतकऱ्यांना एकूण पाच कोटी 28 लाख रुपयांच्या सिंचन विहिरीची अनुदान वाटप केले आहे.त्याच बरोबर या तिन्ही सरपंचांचे विविध ठिकाणी व समाजामध्ये अभिनंदन करण्यात येत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page