डिसलेवाडी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ; ९२,००० हजार रुपये वर्गणी गोळा…
शाळेचा पट फक्त 22 आणि त्यातही भव्य दिव्य कार्यक्रम
:- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे…
जामखेड प्रतिनिधी :-
प्रत्येक शाळेतून अश्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि यातूनच भविष्यातील कलाकार घडत असतात . सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा.तसेच शाळेचा पट फक्त 22 आणि त्यातही अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य कार्यक्रम साजरा करण्यात आला .असे गौरवोद्गार यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी व्यक्त केले आणि कार्यक्रम खूपच छान आणि आयोजन नियोजन केल्याने समाधान व्यक्त केले .
जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डीसलेवाडी येथे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आोजित करण्यात आला होता .
यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुर्ती पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मार्केट कमितीचे सभापती पैलवान शरद कार्ले, संचालक गणेश जगताप, सरपंच मनेश भोसले, सदस्य प्रल्हाद डीसले, कुसडगांवचे माजी सरपंच बापूसाहेब कार्ले,किसन वराट, संतोष राऊत, सुरेश मोहिते,केशव गायकवाड
विक्रम बडे, नवनाथ बडे, महादेव फकिरा मेंगडे, महादेव मेंगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व देशभक्तीपर गीत, गोंधळ, गीत अश्या विविध गीतांचा समावेश होता शाळेत आणि गावात पहिल्यांदाच कार्यक्रम होत असल्याने सर्व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी आलेल्या ग्रामस्थांकडून ९२,००० हजार रुपये वर्गणी देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण राऊत यांनी तर आभार जालिंदर राऊत यांनी मानले.